यावल प्रकल्प अधिकारी यांच्या सोबत आदिवासी एकता परिषद पदाधिकारी यांची बैठक.

53

यावल प्रकल्प अधिकारी यांच्या सोबत आदिवासी एकता परिषद पदाधिकारी यांची बैठक.

यावल प्रकल्प अधिकारी यांच्या सोबत आदिवासी एकता परिषद पदाधिकारी यांची बैठक.
यावल प्रकल्प अधिकारी यांच्या सोबत आदिवासी एकता परिषद पदाधिकारी यांची बैठक.

ईसा तडावी यावल प्रतिनिधी✒
यावल दि.16:आदिवासी एकता परिषद भारत मार्फत आदिवासी विकास विभाग यावल प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे मॅडम यांच्या सोबत आदिवासी एकता परिषद पदाधिकारी यांची बैठक झाली.

१)आदिवासी समाजाच्या लोकांनी वन जमिनी काढलेली आहेत त्या लोकांना फॉरेस्ट अधिकारी त्यांच्यावर अमानवीय कृत्य करतात अशा अधिकाऱ्यांना पत्र देऊन सांगण्यात यावे की ज्या लोकांचे वनदावे भरलेले आहेत त्या लोकांना त्रास देऊ नये.

२)शबरी घरकुल योजनेअंतर्गत ओरिजनल आदिवासी जे आहेत त्यांनाच मिळावे व घरकुल योजनेचा कोठा वाढवून मिळणे बाबत.

३)आदिवासी समाजाच्या मुलांचे प्राथमिक शाळेमधे प्रवेश घेत असतांना तेथील शिक्षक पालकांना नविचारता धर्माच्या कॉलम मधे हिंदू भिल हिंदू पावरा हिंदू पारधी हिंदू कातकरी हिंदू कोकणी इस्लाम ख्रिश्चन असे धर्म नविचारता टाकून देतात त्याच्यामुळे जातीचे दाखले देताना प्रांतअधिकारी निर्णय घेतांना मोठा घोळ होतो व जात पडताळणी नंदुरबार येथील अधिकारी आदिवासीचे प्रकरण निकाली काढतात त्यामुळे आदिवासींना त्रास होतो म्हणून शासनाच्या लक्षात आले म्हणून शासनाने निर्णय घेतला शासन निर्णय२००० प्रमाणे धर्माचा उल्लेख नकरता आदिवासी भिल्ल आदिवासी पावरा आदिवासी तडवी भिल्ल आदिवासी पारधी असे नोंद करण्याचे आदेश आले आहे त्या प्रमाणे संबंधित अधिकारी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांना सुचना देण्या संदर्भ मधे जिल्हा प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे मॅडम यांना निवेदन देण्यात आले.

४)न्यूकलेट बजेट योजना अंतर्गत जास्तीत जास्ती लाभार्थ्यांना जो व्यवसाय शक्य तो व्यवसाय करण्यासाठी लाभ देण्यात यावे त्या बाबत.

५)पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जो घोटाळा व भ्रष्टाचार झालेला आहे अशा दोशी शासकीय अधिकाऱ्यांवर सात दिवसाच्या आत कारवाई करणे बाबत जर सात दिवसाच्या आत ॲट्रॉसिटी ॲक्ट १९८९प्रमाणे गृन्हा दाखल करून कारवाई न केल्यास आदिवासी एकता परिषद भारत यांच्यामार्फत आदिवासी विकास विभाग यावल प्रकल्प कार्यालयावर दनक्या मोर्चा काढण्यात येणार. असे प्रकल्प अधिकारी यांना बजावून सांगितले.

उपस्थित पदाधिकारी आप.सुनिल भाऊ गायकवाड महा.राज्य संपर्क प्रमुख आप.यशवंत अहिरे जिल्हा सचिव आप.सुधाकर सोनवणे जिल्हा संपर्कप्रमुख आप. लहू मोरे जामनेर ता. अध्यक्ष आप. महेंद्र मोरे यावल आप. भगवान गायकवाड जामनेर सल्लागार आप.रमेश दादा गायकवाड व आदी. समाज बांधव उपस्थित होते.