नागपूर कारागृहात असलेला इहतेशम सिद्दीकी याने त्याच्या विरोधातील आरोपांचा तपास एटीएसने पुन्हा करावा, अशा आशयाचे पत्र एटीएस, पंतप्रधान कार्यालय व कारागृह प्रशासनाला पाठवलं
✍त्रिशा राऊत ✍
नागपुर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
📲,9096817053📱
नागपूर: सवित्सर माहिती पुढील प्रमाणे आहे कि २००६ च्या मुंबई लोकलमधील बॉम्बस्फोट प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावलेला व अद्याप त्यावर अंमलबजावणी न झाल्याने नागपूर कारागृहात असलेला इहतेशम सिद्दीकी याने त्याच्या विरोधातील आरोपांचा तपास एटीएसने पुन्हा करावा, अशा आशयाचे पत्र एटीएस, पंतप्रधान कार्यालय व कारागृह प्रशासनाला पाठवलं आहे.नागपूर कारागृहातूनच सिद्दकीने वरील पत्रव्यवहार केला. पण कारागृह प्रशासनाने त्याचे पत्र खरच पुढे पाठवले किंवा नाही म्हणून सिदकीने या बाबत विचारणा केली. त्याला कारागृह प्रशासनाने पत्राचा ‘आॉनवर्ड क्रमांक’ दिला. पण सिद्दकीला पत्र पुढे पाठवल्याची प्रत हवी होती. त्यासाठी त्याने माहिती अधिकार कायद्यान्वये अर्ज कारागृह प्रशासनाकडे दिला. माहिती न मिळाल्याने आयोगाकडे अपील केले. त्यावर माहिती आयुक्तांपुढे सुनावणी झाली.