मिशन वात्सल्य समितीतर्फे कागदपत्र तपासणी शिबीर संपन्न

मिशन वात्सल्य समितीतर्फे कागदपत्र तपासणी शिबीर संपन्न

मिशन वात्सल्य समितीतर्फे कागदपत्र तपासणी शिबीर संपन्न

📝सचिन पवार 📝
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞८०८००९२३०१📞

पेण : कोविड- 19 या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होवून अनाथ झालेल्या बालकांना व कुटूंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होवून एकल, विधवा झालेल्या महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रांचा पूर्तता करुन त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी “शासन आपल्या दारी” या संकल्पनेवर आधारित मिशन वात्सल्य योजनेची राज्यात अमंलबजावणी करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
त्यानुंषगाने कोविड-19 मध्ये मृत्यू पावलेल्या एकल विधवा महिला व बालके किंवा बालकांचा सांभाळ करणारी पालके यांच्यासाठी आज पेण तहसिल कार्यालय येथे सकाळी 11.00 ते 5.00 या वेळेमध्ये कागदपत्र तपासणी तसेच मिशन वात्सल्य योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांकरिता तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पेण मार्फत 12 वर्षांवरील नागरिकांचे कोविड लसीकरण आणि वैद्यकीय तपासणी शिबीर पेण तहसिलदार तथा मिशन वात्सल्य समिती तालुका अध्यक्षा श्रीमती स्वप्नाली डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
यावेळी तालुकास्तरीय मिशन वात्सल्य समितीचे सदस्यही उपस्थित होते.