विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप
गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो.नं.९८६९८६०५३०
मुंबई : – माजळ बौद्ध विकास मंडळ (रजि) मुंबई/ग्रामीण यांच्यावतीने जिल्हा परिषद नवलाई विद्यामंदिर माजळ दि.१५जून २०२३ रोजी सकाळी १२ वाजता मुक्काम माजळ ता. लांजा, जिल्हा रत्नागिरी येथे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शालेय “शैक्षणिक साहित्याचे मोफत” विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मा.विजयकुमार बनकर साहेब (गटशिक्षणाधिकारी लांजा),मा.सौ.संजना माजळकर (सरपंच,निर्मल ग्रामपंचायत माजळ),मा.सौ.स्वप्नाली पिलके उपसरपंच माजळ, मा.श्रीमती. स्वप्नाली सुधीर शेट्ये (मुख्याध्यापिका, माजळ),मा .सौ.स्नेहल तुळसणकर मॅडम, मा. सौ. संजना वारंग मॅडम, मा. श्री. संजय बाईत सर, मा.मनोहर पांडुरंग कांबळे,(मुंबई अध्यक्ष, माजळ बौद्ध विकास मंडळ),मा.आनंद बाबू कांबळे(ग्रामीण सरचिटणीस, माजळ बौद्ध विकास मंडळ, आणि ग्रा. प. सदस्य, माजळ), श्री. संजय चव्हाण (ग्रामस्थ),तसेच शिवानी कांबळे,शिवराज कांबळे, अशोक कांबळे, भीमराज कांबळे,हितेश कांबळे,अतिश कांबळे आदी. कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.