श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडीट को-ऑप. सोसायटी लि. शिर्डीतर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्यचे वाटप
संजय महाजन
राहता तालुका प्रतिनिधी
मो.नं. ८३०८९६४२६८
१६जुन: श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडीट को-ऑप. सोसायटी लि., शिर्डीतर्फे संस्थेच्या सभासदांचे व कर्मचाऱ्यांचे मुला-मुलींना शैक्षणिक प्रोत्साहन म्हणुन समारंभपूर्वक शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी मा. सौ. शालीनीताई विखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा, अहमदनगर ह्या होत्या. संस्थेच्या विद्यमान चेअरमन सौ. श्रध्दा विजय कोते पा. यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना संस्थेच्या उलाढालीची सविस्तर माहिती विषद करुन संस्थेचे आधारस्तंभ सन्मा. नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील तसेच मार्गदर्शक सन्मा. खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील यांनी संस्थेच्या इतिहासात प्रथमच एका महिलेच्या रुपाने मला चेअरमन म्हणुन काम करण्याची संधी प्राप्त करुन दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानले.
मा. सौ. शालीनीताई विखे पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शालेय विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करुन संस्थेच्या प्रगतीबाबत व संस्था सभासदांसाठी राबवत असलेल्या उपक्रमांबाबत संचालक मंडळास धन्यवाद दिले संस्थेच्या मोठया कारभाराचा विचार करता मा. नामदार साहेब तसेच खासदार डॉ. सुजय विखे यांनी संस्थेच्या इतिहासात प्रथमच एका महिलेस जी चेअरमन पद भुषविण्याची संधी दिली त्या संधीचे म्हणुन सौ. श्रध्दा कोते यांना सोन केल अशा शब्दात त्यांचा गुणगौरव केला.
संस्थेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा भेट वस्तु देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मा.शालीनीताई विखे पाटील व उपस्थित मान्यवरांचे शुभ हस्ते शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले शेवटी संस्थेचे संचालक श्री तुषार शेळके पा. यांनी सर्वांचे आभार मानले. सदर प्रसंगी मा. डॉ. आकाश किसवे साहेब, संजय जोरी साहेब, प्रशासकीय अधिकारी साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, संस्थेचे माजी व्हा. चेअरमन चंद्रकांत गुरव, विद्यमान व्हा. चेअरमन श्री दिनेश कानडे, संचालक प्रतापराव कोते पा., यादवराव कोते पा., तुषार शेळके पा., जितेंद्र गाढवे पा., विलास गोंदकर पा., दिपक धुमसे, संदिप बनसोडे, तज्ञ संचालीका सौ. निर्मला सलगरकर, सचिव नबाजी डांगे पा. व मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी व सभासद उपस्थित होते.