350 व्या शिवराज्यभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त पाचाड येथे सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न..
✍️सचिन पवार
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301
रायगड :-350 व्या श्री शके राज्याभिषेक सोहळ्या निमित्त मौजे पाचाड (रायगडचा पायथा) येथे दि.01 ते 06 जून 2023 या कालावधीत दरम्यान विविध भव्य दिव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र राज्य व संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हाधिकारी कार्यालय रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
दि.01 जून, 2023 रोजी सायंकाळी 6 ते 9.30 वाजता श्री. नंदेश उमप आणि सहकलाकार यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य पराक्रमावर भव्य-दिव्य कार्यक्रमाचे सादरीकरण केले.या कार्यक्रमास आमदार भरत गोगावले व त्यांचे कुटुंबीय, विधानसभा सदस्य महेंद्र थोरवे, प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य विभाग विकास खारगे, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अधिकारी व महसूल अधिकारी, मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी, ग्रामस्थ शिवभक्तांनी हा कार्यक्रम याची देही याची डोळा पाहिला. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या समन्वयाची जबाबदारी तळा तहसिलदार स्वाती पाटील यांनी यशस्वीरित्या सांभाळली.
दि.02 जून, 2023 रोजी सायंकाळी 6.00 ते 9.30 वाजता शिवकल्याण राजा, या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. दि.03 जून, 2023 रोजी सायंकाळी 6.00 ते 9.30 वाजता शिववंदना या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.या सर्व कार्यक्रमांचे महासंस्कृती या शासनाच्या युट्युब चॅनलवरुन थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.