बालीका वधू मधील प्रसिद्ध अभिनेत्रीच निधन. बॉलिवूड शोकाकुळ.

✒️नीलम खरात✒️
मुंबई महानगर प्रतिनिधी
9136879930
मुंबई,दि.16 जुलै:- मुंबईतून बॉलिवूड आणि हिंदी टेलिव्हिजन दुनियेतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. देशातील टीवीवरची लोकप्रिय मालिका ‘बालिका वधू‘ मधील दादी सा म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सीकरी यांचे शुक्रवारी दि.16 जुलै ला दुखद निधन झाले आहे. सुरेखा सीकरी त्यांच वयाच्या 75 व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांनी मुंबईमध्ये अंतीम श्वास घेतला आहे.
सुरेखा सीकरी याना दुसरा ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर त्या या आजाराशी अनेक दिवसा पासून झुंज देत होत्या. अखेर त्यांनी आज या जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या संपूर्ण परिवारावर तसेच त्यांच्या चाहत्यांवर बॉलिवूड आणि हिंदी टीवीच्या दुनियेत दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा सीकरी यांचा जन्म भारत स्वातंत्र्य पूर्व काळात म्हणजे 16 एप्रिल 1945 रोजी झाला होता.
सुरेखा सीकरी यांनी 1978 साली ‘किस्सा कुर्सी का’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा एक पॉलिटिकल ड्रामा होता. या चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला होता. तसेच त्यांनी तीन वेळा उत्कृष्ट सहायक अभिनेत्री म्हणून नॅशनल अवॉर्ड जिंकले आहेत. ‘तमास’ 1988, ‘ममो’ 1995 आणि ‘बधाई हो’ 2018 या चित्रपटासाठी त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळाले आहेत. तसेच त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांच्या मृत्युने सर्वत्र दुःखाचे वातावरण पसरले आहे. त्यांचे कुटुंब शोक व्यक्त करत आहे.