ईदची नमाज घरीच करा बकरी ईदसाठी मार्गदर्शक सूचना जारी प्रतिकात्मक कुर्बानी क रण्याचे मनपाचे आवाहन

ईदची नमाज घरीच करा

बकरी ईदसाठी मार्गदर्शक सूचना जारी

प्रतिकात्मक कुर्बानी क रण्याचे मनपाचे आवाहन

ईदची नमाज घरीच करा बकरी ईदसाठी मार्गदर्शक सूचना जारी प्रतिकात्मक कुर्बानी क रण्याचे मनपाचे आवाहन
ईदची नमाज घरीच करा
बकरी ईदसाठी मार्गदर्शक सूचना जारी
प्रतिकात्मक कुर्बानी क रण्याचे मनपाचे आवाहन

संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

चंद्रपूर  : कोविड-19 मुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी दि. २१ जुलै राजी बकरी ईद साजरी करण्यासंदर्भात गृह विभागाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीत बकरी ईदची नमाज मस्जिद ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी, अशा सूचना मनपा प्रशासनाने दिल्या आहेत.

गृह विभागाच्या सुचनेनुसार बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये. कोविड विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. ‘ब्रेक दि चैन’ चे निर्बंध तसेच त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांनुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही. सध्या कार्यान्वित असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत