प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी 23 जुलैपर्यंत मुदतवाढ* *शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर*

*प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी 23 जुलैपर्यंत मुदतवाढ*

*शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर*

प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी 23 जुलैपर्यंत मुदतवाढ* *शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर*
प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी 23 जुलैपर्यंत मुदतवाढ*
*शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर*

मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यू-8208166961

नांदेड (जिमाका) दि. 15 :- प्रधानमंत्री पिक विमा योजनेतर्गंत नांदेड जिल्ह्यासाठी इफको टोकीयो कंपनीची नियुक्ती केली आहे. या योजनेंतर्गत सन 2021-22 मध्ये खरीप हंगामासाठी पिक विमा प्रस्ताव स्विकारणे सुरु झाले आहे. पिक विमा भरण्याचा अंतिम मुदत आता शुक्रवार 23 जुलै पर्यंत वाढविली आहे. पिक विमा योजनेत ज्या शेतकऱ्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी तात्काळ पिक विम्याची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

यापूर्वी पिक विमा भरण्याचा अंतिम मुदत 15 जुलै दिली होती. तथापि महाराष्ट्र शासनाने भारत सरकारच्या कृषि मंत्रालयाला एवढ्या अल्पमुदतीत शेतकऱ्यांना पिक विमा काढणे कठीन असल्याचे निदर्शनास आणून यात मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. कोविड-19 ची परिस्थिती आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन ही मुदतवाढ करीत असल्याचे भारत सरकारच्या कृषि मंत्रालयाचे सहाय्यक आयुक्त सुनिलकुमार यांनी आदेशात म्हटले आहे.