*सोयगावात 26 रोजी आरटीओ कॅम्प*

✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यु-8208166961
औरंगाबाद, दिनांक 15 (जिमाका) : सोयगावातील आरटीओ कामकाजाशी संबंधित 16 जुलै रोजीचा पूर्वनियोजित कॅम्प प्रशासकीय तांत्रिक अडचणीमुळे रद्द करण्यात आला आहे. हा कॅम्प सोमवार, 26 जुलै रोजी होईल. तरी याबाबत सोयगावातील सर्व वाहनधारक, वाहनमालक, आरटीओ कार्यालयाशी संबंधित यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी स.प्र.मेत्रेवार यांनी केले आहे.