तारसा ( बुज ) सांडपाणी वाहून जाणाऱ्या नालीचा त्वरित उपसा करा …. ग्राम पंचायत सदस्य निकेश बोरकुटे यांची मागणी

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपीपरी तालुक्यातील तारसा ( बुज ) येथील वार्ड क्रं २ मधील व इतर वार्डातील सांडपाणी वाहून नेण्याकरीता नाल्या आहेत ..मात्र नाल्या उपसा न केल्याने सांडपाण्याने तूडूंब भरुन असतांनाच पावसाळा सुरू होण्यापूर्वी च ग्राम पंचायत ने नालीचा उपसा करायला पाहिजे होता ..उपसा न केल्याने नालीतील सांडपाणी वाहून न जाता नालीतच जमा होऊन राहल्याचे निर्दशनास आले आहे .नालीत सांडपाणी साचून असल्याने याचा नाहक त्रास गावकऱ्यांना सहन करावा लागत आहे
त्यामुळे सांडपाणी वाहून जाणाऱ्या गावातील नाली उपसा करण्यात यावी अशी मागणी ग्राम पंचायत सदस्य निकेश बोरकुटे यांनी केले आहे नागरीकांच्या घरासमोरील वाहणाऱ्या व वार्डातील सांडपाणी साचून असल्याचे नागरिक सांगत आहेत त्या संदर्भात नागरीकांचे तक्रारी वाढल्या आहेत डासाचे प्रमाण वाढुन विविध आजार गावात पसरत आहे करीता लवकरात लवकर नाली उपसा करण्यात यावी अशी मागणी ग्राम पंचायत सदस्य निकेश बोरकुटे यांनी केले आहे