उप पोलीस स्टेशन देचलीपेठा येथे आयोजित केलेल्या भव्य कृषि मेळाव्याला शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती

*उप पोलीस स्टेशन देचलीपेठा येथे आयोजित केलेल्या भव्य कृषि मेळाव्याला शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती

उप पोलीस स्टेशन देचलीपेठा येथे आयोजित केलेल्या भव्य कृषि मेळाव्याला शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती
उप पोलीस स्टेशन देचलीपेठा येथे आयोजित केलेल्या भव्य कृषि मेळाव्याला शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती

मारोती कांबळे
गडचिरोली जिल्ह्या ग्रामीण प्रतिनिधी
मो नं ९४०५७२०५९३

सिरोंचा : मा.पोलीस अधिक्षक अंकित गोयल सा,अप्पर पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया सा,अप्पर पोलीस अधिक्षक समीर शेक सा,अहेरीचे अप्पर पोलीस अधिक्षक सोमय मुंढे सा यांच्या संकल्पनेतून व उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा राहूल गायकवाड सा यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोस्टे देचलीपेठा येथील प्रांगणात दिनांक 13/07/2021 भव्य कृषी मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात शेतकऱ्यांना विविध योजनाचा लाभ देण्यात आला.
मेळाव्यामध्ये उपपोस्टे देचलीपेठा हद्दीतील ग्रा. प. देचली, ग्रा. प. पेठा व ग्रा. प. कोजेड येथील तलाठी, ग्रामसेवक, सरपंच,उपसरपंच, सदस्य,पोलीस पाटील,कोतवाल,आश्रमशाळा पेठा येथील शिक्षक वृंद,अंगणवाडी सेविका व हद्दीतील शेतकरी व युवा वर्ग असे 300 ते 350 ग्रामस्थ सदर मेळाव्यात उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा मा. राहूल गायकवाड सा,सीआरपीएफ चे असि कमांडट शकील अहमद सा,उपपोस्टे देचलीपेठा येथील प्रभारी अधिकारी मा.सुधीर साठे, कृषी सहाय्यक ज्योती आत्राम, मंडल अधिकारी जिमलगट्टा सिडाम,ग्रामसेवक देचली कुमरे, तलाठी कन्नाके,पेठा आश्रमशाळेचे मुख्याध्यापक देशमुख सर,व वनविभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला हार घालून दिपप्रज्वलण करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले….
मेळाव्यात उपस्थित शेतकऱ्यांना अनुदानवर भाताचे बियाणे वाटप करण्यात आले, व विविध झाडांची रोपे वाटप करण्यात आली.तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी यांच्या वतीने पेठा आश्रमशाळा येथील शिक्षकांच्या मदतीने खावटी अनुदान योजने अंतर्गत अन्यधान्या चे किट वाटप करण्यात आले तसेच बऱ्याच वर्षांपासून मौजा सिंधा येथील लोकांना जात प्रमाणपत्र नसल्याने त्यांना शासकीय योजनांचा फायदा घेता येत नव्हता परंतु उपविभागीय पोलीस अधिकारी साहेबांनी वारंवार पाठपुरावा केल्याने त्यांच्या प्रयत्नातून सिंधा गावातील नागरिकांना जात प्रमाणपत्र प्राप्त झाले व मेळाव्यात ते वाटप करण्यात आले. त्यामुळे आता शासकीय योजणांचा घेता येणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले व सदर कार्यक्रमा करिता देचलीपेट्टा पोस्टचे पोलीस उपनिरीक्षक गोमेद पाटील, पोउपनि भारत वर्मा,पोउपनि तायडे व उप पोस्टचे कर्मचारी व एसआरपिएफ तसेच सिआरपीएफ कर्मचारी यांनी सहकार्य केले…