*वाघाच्या हल्यात एक बैल जागीच ठार कोठारी येथील घटना*

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
कोठारी … बल्लारपूर तालुक्यातील कोठारी पोलिस स्टेशन च्या अगदी मागे शेतशिवार लागून आहे सध्या सर्वत्र शेतीचे कामे चालू आहे . शेतीचे कामे आटपून घरी परत येत असताना वाघाच्या हल्यात बैल ठार झाल्याची घटना आहे
सविस्तर असे की शेतकरी संजय गुरू यानी काल सायंकाळी आपले काम आटोपून घरी परत येत असताना अंधार पडला त्या मार्गावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करून जागीच ठार केले या बैलाची अंदाजे किंमत ६०००० इतकी होती सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने बैलं ठार झाल्याने शेतकऱ्यांचा हात मोडल्यासारखे झाले असून वनरक्षक श्री टेकाम पंचनामा करून पूढील तपास करीत आहे