ट्विंकल इंग्लिश स्कूल नागभिड येथे गुरुपोणिॅमा पुजेचा कार्यक्रम संपन्न

55

ट्विंकल इंग्लिश स्कूल नागभिड येथे गुरुपोणिॅमा पुजेचा कार्यक्रम संपन्न

अरुण रामुजी भोले

नागभिड तालुका प्रतिनिधी

मो: 9403321731

नागभिड— श्रीमती रामप्यारीदेवी आसारामजी काबरा, ट्विंकल इंग्लिश स्कूल, नागभीड, ता.नागभीड, जि.चंद्रपूर येथे गुरू पोर्णिमेचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला मंचावर समिधा सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री. गणेश जैरामजी तर्वेकर, सचिव श्री. अजय रमेशचंद्रजी काबरा, शाळेच्या प्राचार्या सौ. शुभांगी पोहेकर, मुख्याध्यापिका श्रीमती संगिता नारनवरे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्याने श्री गणेश तर्वेकर व श्री. अजय काबरा यांनी गुरू पोर्णिमेविषयी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व योग्य मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी गुरूपोर्णिमेच्या निमित्याने कबीर यांचे दोहे – “गुरु गोविन्द दोऊ खड़े काको लागूं पायं। बलिहारी गुरु आपने जिन गोविन्द दियो बताय॥”, श्लोक – “देवो रुष्टे गुरुस्त्राता गुरो रुष्टे न कश्चन:। गुरुस्त्राता गुरुस्त्राता गुरुस्त्राता न संशयः॥”, चौपाई- “गुरु बिन भव निधि तरइ न कोई । जौ बिरंचि संकर सम होई ॥” आणि गुरू पोर्णिमेविषयी नृत्य तसेच भाषण सुद्धा दिले. तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना गुरूपोर्णिमेविषयी ये चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले.

अशा प्रकारे ट्विंकल इंग्लिश स्कूल, नागभीड येथे संपूर्ण शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी, संपुर्ण विद्यार्थी वर्ग गुरू पोर्णिमेच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.