विधीसंघार्षित २ बालकाने १३ वर्षीय मुलीवर केले लैंगिक अत्याचार; नेरळ पोलिसांत गुन्हा दाखल
संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३
नेरळ शहरातील कोटवाडी येथील पडीक बंगल्यात शांत ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, एका यात २ विधीसंघार्षित बालकाने सोशल मिडीयावर ओळख करून
१३ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पालकांच्या तक्रारीवरून नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि घटना घटना संपूर्ण जून महिन्यापासून ते 5 जुलै २०२५ पर्यत घडत होती. इंस्टा ग्राम या शोषल एकाउंट वर मैत्री करून एका पडीक बंगल्यावर बोलून घेऊन पिडीत अल्पवयीन माहित असताना देखील
तिच्याशी जबरदस्तीने अतिप्रसंग केले व त्याचे चित्रीकरण केले. पिडीतास धमकावले व बाहेर कोणाला सांगितले तर हे सर्वे चित्रीकरण सोशल मिडीयावर
व्हायरल करू अशी धमकी तिला वारंवार देण्यात येत होती. अखेर पीडित मुलाने आपल्या आईला घडलेल्या प्रकाराबाबत सांगितल्यावर ही बाब आज उघडकीस आली.
नेरळ पोलीस ठाणे येथे पिडीत व नातेवाईक यांनी प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांना हि बाब सांगितली शाणाचाही विलंब न
लावता त्यांनी टीम तयार करून सुरवातील घरात झोपलेल्या मुलाच्या प्रेमाने बोलून घेऊन चौकशी केली व दुसऱ्या मुलाचा शोध घेऊन त्यालाही ताब्यात घेण्यात आले.
“गुन्हा क्रमाक114/2025 संबंधित बालकावर भा.न्या.सं. 2023 कलम 64 (2)(M) (I), 35 (1) व पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act 2012 चे कलम 4,6)
गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाची चौकशी अत्यंत संवेदनशीलतेने केली जात असून, दोन्ही बालकांसाठी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली जात आहे, उपविभागीय पो.अधिकारी विक्रम कदम व प्र.पोलीस ठाणे अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शन खाली
महिला पोलीस अधिकारी प्राची पांगे करीत आहेत. तर या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, स्थानिक नागरिकांनी बालकांमध्ये लैंगिक शिक्षण व सामाजिक मूल्यांची गरज अधोरेखित केली आहे. बालकांचे मानसिक आरोग्य आणि सुरक्षितता यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.