नागभीडच्या मुस्तकीम शेख यांचा दुर्दैवी मृत्यू: रुग्णवाहिका बिघाड आणि रुग्णालयाच्या दुर्लक्षामुळे प्राण गमावला?

नागभीडच्या मुस्तकीम शेख यांचा दुर्दैवी मृत्यू: रुग्णवाहिका बिघाड आणि रुग्णालयाच्या दुर्लक्षामुळे प्राण गमावला?

अमान क़ुरैशी
मीडिया वार्ता प्रतिनिधि
8275553131
नागभीड येथील रहिवासी। मुस्तकीम शफी शेख (वय अंदाजे 29 वर्षे) यांची प्रकृती दिनांक 29/06/2025 रोजी सायंकाळी 6 वाजता अचानक बिघडली. त्यांना फिट्स व झटके येत असल्याने तातडीने ग्रामीण रुग्णालय, नागभीड येथे दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून रुग्णाला पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले.

कुटुंबीयांनी तत्काळ क्रिस्तानंद हॉस्पिटल, ब्रम्हपुरी येथे रुग्णाला ऍडमिट केले. रुग्ण गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगत व्हेंटिलेटरची गरज असल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी ₹10,000 बेड चार्ज, ₹11,700 ची औषधे, आणि पुढे आणखी विविध शुल्क आकारण्यात आले. एकूण ₹35,400 रुग्णाच्या उपचारासाठी खर्च झाले.

या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान डॉक्टरांकडून उपचारात विलंब झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच रुग्णास व्हेंटिलेटरसह दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यासाठी ₹17,000 घेतले गेले, परंतु या रुग्णवाहिकेने रात्रौ 11:30 वाजता भिसी-गिरड मार्गावर नांद गावाजवळ जंगलात अचानक काम करणे बंद केले.

रुग्ण अतिगंभीर अवस्थेत असतानाही सुमारे 2 ते 4 वाजेपर्यंत दुसऱ्या रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करण्यात आली. त्यामुळे वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत आणि परिणामी रुग्णाच्या शरीराच्या डाव्या बाजूला पक्षाघात (पॅरालिसीस) झाला.

4:00 वाजता पहाटे दत्ता मेघे हॉस्पिटल, वर्धा येथे रुग्ण दाखल झाला. प्रकृती अधिकच खालावल्यामुळे 02/07/2025 रोजी रुग्णास नागपूरच्या AIIMS रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु तिथेही उपचारांदरम्यान रुग्ण कोमामध्ये गेला.

12/07/2025 रोजी रुग्णाला नागभीड येथे घरी आणण्यात आले आणि 14/07/2025 रोजी सकाळी 7:30 वाजता त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

प्रश्न उपस्थित होतोय:

जेव्हा हॉस्पिटलने रुग्णवाहिकेसाठी ₹17,000 घेतले आणि रुग्णाला सुरक्षितपणे पोहचवण्याची हमी दिली, तेव्हा रस्त्यात वाहन बिघडल्यास जबाबदारी कोणाची?

रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली असती तर रुग्णाचा जीव वाचला असता का?

हॉस्पिटलमध्ये घेतले गेलेले अतिरिक्त पैसे, विलंब आणि गैरव्यवस्थापन हे रुग्णाच्या मृत्यूला कारणीभूत नाही का?

मागणी:

रुग्णाच्या कुटुंबियांनी क्रिस्तानंद हॉस्पिटल आणि संबंधित डॉक्टरांवर “सदोष मनुष्यवधाचा” गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यांनी या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई व्हावी, अशी विनंती प्रशासनाकडे केली आहे.