नेरळ: २० जुलै रोजी रस्ता रोको आंदोलन करणार : गोरख शेप
संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३
कर्जत कल्याण महामार्गालगत पोशवाई रोड आहे जो पूर्वीपासून रहदारीचा रस्ता आहे. सध्या ह्या रस्त्याची प्रचंड प्रमाणत दुरावस्था झाली आहे.
अनेकांनी ह्या रस्त्याबाबत संबधित अधिकारी वर्गाशी पत्र व्यवहार करून देखील हा रस्ता अध्याप झाला नाही.
सामाजिक कार्यकता गोरख शेप यांनी आज नेरळ येथे पत्रकार परिषद घेऊन दिनांक २० जून रोजी नेरळ कोल्हारे साई मंदिर परिसरात रस्ता रोको आंदोलन करणार
असल्याचे सांगितले. हा राजकीय आंदोलन नसून असंख्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाविरुद्ध अन्यायाला थांबवण्याचा प्रयत्न असणार आहे व त्यास नेरळ येथील नागरिक असतील असे ते बोलले.
त्यांनी कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांना हि बाब वारंवार सांगून देखील हा रस्ता होत नाही. त्यांनी दखल घेऊन हा रस्ता मार्गी लावावा.