15 दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई

15 दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई

सिंदेवाही येथे वाहतूक पोलिसांची धडक कारवाई
जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही प्रतिनिधी
8806689909
सिंदेवाही प्रतिनिधी :- सिंदेवाही शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सिंदेवाही पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. सिंदेवाही पोलिस निरीक्षक किरण पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी सोमवारी (दि.14) शिवाजी चौकात विशेष मोहीम राबवून अल्पवयीन, हेल्मेटविना आणि लायसन्स नसलेल्या एकूण 15 दुचाकीचालकांवर दंडात्मक कारवाई केली.

गेल्या काही दिवसांपासून सिंदेवाही परिसरात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात दुचाकी चालवताना दिसत होते. यातील अनेकजण वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करत होते. याची दखल घेत सिंदेवाही वाहतूक पोलिसांनी सोमवारी सकाळी शिवाजी चौकात दुचाकी चालकांची कसून चौकशी

केली. या तपासणीत तब्बल 15 दुचाकीचालकांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे शहरात दुचाकींवर स्टंटबाजी करणाऱ्या तसेच वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना चांगलाच वचक बसला आहे. भविष्यातही अशाच प्रकारची कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन सिंदेवाही पोलिसांनी केले आहे.