भारतीय जनता पार्टी कळमेश्वर – ब्राम्हणी तर्फे 75 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

भारतीय जनता पार्टी कळमेश्वर – ब्राम्हणी तर्फे 75 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

भारतीय जनता पार्टी कळमेश्वर - ब्राम्हणी तर्फे 75 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
भारतीय जनता पार्टी कळमेश्वर – ब्राम्हणी तर्फे 75 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

युवराज मेश्राम✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9923296442

कळमेश्वर:- भारतीय जनता पार्टी कळमेश्वर – ब्राम्हणी शहराच्या वतीने 75 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण डॉ. भाभा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रभाकररावजी श्रीखंडे यांच्या हस्ते, भाजपा प्रदेश कार्यकारीणी सदस्य डॉ. राजीवजी पोतदार सर, भाजपा नागपुर जिल्हा महामंत्री ईमेश्वरजी यावलकर साहेब यांच्या उपस्थितित ओंकारअप्पा मरडवार यांचे निवासस्थानी बाजार चौक कळमेश्वर येथे पार पडला.

यावेळी नगराध्यक्षा सौ स्मृतिताई ईखार, शहर भाजपा महीला मोर्चा अध्यक्षा सौ सविताताई नाथे, शहर भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सुनिलजी चुनारकर, सर्व सन्माननीय नगरसेवक व नगरसेविका, सर्व सन्माननीय शहर कार्यकारीणी पदाधीकारी व सदस्य, सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, सर्व सन्माननीय वरिष्ठ नागरिक, सर्व सन्माननीय बूथ प्रमुख, महीलाप्रमुख, युवा प्रमुख, सर्व सन्माननीय नागरिक व सर्व सन्माननीय महीला व युवा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहर भाजपाच्या वतीने कोरोना काळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता शहर व परिसरातील प्रत्येक रुग्णाची सकाळी 6-00 ते रात्री 2-3 किवा रूग्ण असेपर्यत सेवा केली व कोरोना म्रुतांचा आकडा मर्यादित ठेवून अनेक परिवार उध्वस्त होण्यापासून वाचविल्याबददल कोरोना योद्धा म्हणून डॉ. राजीवजी पोतदार सर यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या शहरातील व तालुक्यातील विद्यार्थ्यांना 12 वी नंतरच्या शिक्षणाकरीता नागपुरला जावे लागायचे जे सर्वांकरीता शक्य नव्हते व त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले, म्हणून पुढाकार घेऊन डॉ. भाभा शिक्षण संस्था स्थापन करुन विद्यार्थ्यांसाठी संधी दिली करीता संस्थेचे अध्यक्ष व जिल्ह्यातील प्रतिष्ठीत संत्रा व्यापारी प्रभाकररावजी श्रीखंडे यांचे, तसेच आपल्या पूर्ण आयुष्यात शिक्षीका बनून अनेक यशस्वी विद्यार्थी घडविले व मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिक श्रीमती सुलुताई पाठक यांचे तसेच शासकीय सेवेत उच्च पदावर उत्तम सेवा देऊन निवृत्त झाल्यावर पुढाकार घेऊन शहरात संत गजानन महाराज देवस्थानच्या रुपात मंदीर जनतेकरीता बनविल्याबददल देवस्थानचे वरिष्ठ विश्वस्त ज्येष्ठ नागरिक काशीनाथजी चिमुरकर साहेब यांचे सत्कार करण्यात आले.

सर्व सन्माननीयांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाले करीता सर्वांचे आभार व धन्यवाद धनराज देवके अध्यक्ष भाजपा कळमेश्वर ब्राम्हणी शहर यानी मानले.