सोलापूर जिल्हात दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ.

✒प्रवीण वाघमारे✒
सोलापूर प्रतिनिधी
9923456641
सोलापूर/करमाळा,दि.16 ऑगस्ट:- सोलापूर जिल्हातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेराहून 2 लाख रुपये आणावते म्हणून पती व सासू-सासरे व दीर यांनी मिळून विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी पाच जणांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी सानिया अस्लम शेख वय 20 वर्ष, रा. सावंत गल्ली, करमाळा यांनी पोलिसात जाऊन छळ करणा-या आपल्या सासरच्या लोकांन विरोधात तक्रार दिली आहे.
सानियाचा विवाह अस्लम राजू शेख रा. कलेढोण, शेखवस्ती ता. खटाव, जि. सातारा याच्याबरोबर 2018 मध्ये झाला होता. पतीने कसेबसे 15 दिवस सांभाळले. त्यानंतर पती अस्लम शेख, सासू रजिया शेख, सासरे राजू शेख, दीर शाहरूख शेख सर्व रा. कलेढोण, शेखवस्ती, ता. खाटाव, जि. सातारा यांच्याकडून सतत मारहाण झाली. तसेच माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये म्हणून छळ सुरू केला. रात्री-अपरात्री घराबाहेर काढण्याचा प्रकार झाला. याप्रकरणी करमाळा पोलिसांनी सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.