नागपुरातील ‘गंगा जमुना’मध्ये वारंगणांचे आंदोलन, पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स हटवले

नागपुरातील ‘गंगा जमुना’मध्ये वारंगणांचे आंदोलन, पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स हटवले

नागपुरातील 'गंगा जमुना'मध्ये वारंगणांचे आंदोलन, पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स हटवले
नागपुरातील ‘गंगा जमुना’मध्ये वारंगणांचे आंदोलन, पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स हटवले

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953

नागपूर : – नागपुरात वारंगणांची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगा जमुना मध्ये आज तीव्र आंदोलन करण्यात आलं. सुरुवातीला शांततेने सुरू असलेले आंदोलन नंतर हिंसक झाले.

नागपूर पोलिसांनी 11 ऑगस्ट रोजी गंगा जमुना वस्ती चारही बाजूने बॅरिकेट्स लावून सील केली होती. सकाळी विदर्भ अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या ज्वाला जांबुवंतराव धोटे अचानक गंगा जमुना बस्ती पोहोचल्या आणि त्यांनी आंदोलन सुरू केले.

या वस्तीत अल्पवयीन मुलींकडून बेकायदेशीररित्या देहव्यापार करून घेतला जातो, तसेच वस्तीतून काही गुन्हेगार आणि असामाजिक तत्त्व अंमली पदार्थांचा व्यापार चालवतात, वस्तीतून गुन्हेगारीला चालना दिली जाते असं कारण पोलिसांकडून गंगा जमुना बस्ती सील करताना देण्यात आलं होतं.