कळमेश्वर येथील बाजार चौकात नगराध्यक्ष स्मृती कार यांच्या हस्ते ध्वजारोहण.

✒युवराज मेश्राम✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
कळमेश्वर:- देशात काल 75 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहवर्धक वातावरण साजरा करण्यात आला. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय सन असल्याने नागपुर जिल्हातील कळमेश्वर तालुक्यात पण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कळमेश्वर येथील बाजार चौक येथे सार्वजनिक ठिकाणी झेंडावंदन कळमेश्वर नगरीच्या नगराध्यक्षा स्मृतीताई ईखार यांच्या हस्ते सकाळी साडेआठ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगर परिषदेच्या उपाध्यक्ष जोशना मंडपे, प्रगती मंडळ सत्यवान मेश्राम, धनराज देवके, महादेव विखार, फत्तेसिंग मरडवार सर, संजु मंडपे, वर्षा कांबळी नगरसेवक मनोज शेंडे नामदेवराव वैद्य व सर्व नगरसेवक कर्मचारीवर्ग शहरातील सर्व गणमान्य व्यक्ती उपस्थित होते. त्याचप्रमाणे पत्रकार मंडळी सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते.