केंद्रीत मंत्री भागवत कराडांच्या जन यात्रेची गोपीनाथ गडावरूनच सुरुवात.

✒श्याम भुतडा✒
बीड जिल्हा प्रतिनिधी
940411800
बीड,दि.15 ऑगस्ट :- मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना डावलून भाजपचे नेते भागवत कराड यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात आले. त्यामुळे पंकजा मुंडे या खुप नाराज असल्याचं समोर आलं होतं. पण, आता भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रा गोपीथनाथ गडावरून सुरू होणार आहे. अखेर या यात्रेबद्दल पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पत्रकाराशी बोलत असताना पंकजा मुंडे यांनी उद्या 16 तारखेच्या गोपीनाथ गडावर होणाऱ्या यात्रेबद्दल आपली भूमिका मांडत असताना त्यांनी काढलेल्या यात्रेची आठवण व्यक्त केली. जन आशीर्वाद यात्रा संबंध देशभर आहेत. ज्या मंत्र्यांना नुकतेच मोदी सरकार मध्ये केंद्रात मंत्रिपद मिळाले त्यांनी जनतेचे आशीर्वाद घ्यावेत हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे. माझ्याकडेही आंध्रप्रदेश आणि कर्नाटकची जबाबदारी दिलेली आहे, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. भागवत कराड बीडमधून यात्रा काढणार आहे. मराठवाड्याची यात्रा परळीतून गोपीनाथ गडावरून यासाठी निघते आहे.