*राष्ट्वादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी शशिकांत उर्फ बाळू धुमाळ तर शहर अध्यक्ष पदी प्रकाश खुडसंगे यांची नियुक्ती*

राळेगाव/यवतमाळ साहिल महाजन यवतमाळ प्रतिनिधी मीडिया वार्ता न्यूज 9309747836
राळेगाव तालुक्यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्यां शशिकांत उर्फ बाळू धुमाळ यांची राष्ट्वादी काँग्रेस च्या तालुकाध्यक्ष पदी तर शहर अध्यक्ष पदी प्रकाश खुडसंगे याची निवड करण्यात आली राष्ट्वादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब उर्फ क्रांती कामारकर यांच्या स्वाक्षरीचे नियुक्ती पत्र त्यांना आज देण्यात आले.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते संदीप बाजोरिया, आ इंद्रनील नाईक , प्रदेश उपाध्यक्ष बाबासाहेब गाडे पाटील, राष्ट्वादी काँग्रेस महिला अध्यक्षा सारिका ताजने, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष रितेश बोबडे यांच्या उपस्थितीत सदर नियुक्ती करण्यात आली .
राष्ट्वादी काँग्रेस ची सर्वसमावेशक विचारधारा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे सक्षम नेतृत्व, जयंत पाटील साहेब यांचे मार्गदर्शक अजितदादा पवार यांची विकासदृष्टी व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर, संदीपभाऊ बाजोरिया, बाबासाहेब गाडे पाटील तथा सर्व राष्ट्वादी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस चे संघटन राळेगाव तालुका सह शहरात अधिक मजबूत करू अशी भावना शशिकांत उर्फ बाळू धुमाळ व प्रकाश खुडसांगे यांनी नियुक्ती पत्र देते वेळी व्यक्त केली.
नगरसेवक बाळु धुमाळ त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने राळेगाव तालुक्याच्या राजकीय वर्तुळात एका दमदार व्यक्तिमत्वाची एन्ट्री झाल्याने राळेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस चागले दिवस येतील अशी प्रतिक्रिया व्यक्त होतांना दिसते.
आगामी नगरपंचायत जिल्हा परिषद निवडणूक लक्षात घेता ह्या निडणुकीसाठी राष्ट्रवादी सज्ज झाल्याचं चित्र या नियुक्ती वरून दिसून येत आहे .