सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून दोन भावाच्या जलाशयात पडून दुर्दैवी मृत्यू.

सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून दोन भावाच्या जलाशयात पडून दुर्दैवी मृत्यू.

सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून दोन भावाच्या जलाशयात पडून दुर्दैवी मृत्यू.
सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून दोन भावाच्या जलाशयात पडून दुर्दैवी मृत्यू.

युवराज मेश्राम✒

नागपुर जिल्हा प्रतिनिधी

9527526914

नागपूर :- स्वातंत्र्य दिनाला नागपुर जिल्हातून एक धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी समोर आली आहे. गोसेखुर्द धरण पाहण्यासाठी गेलेल्या उमरेड येथील भावंडाना गोसेखुर्द जलाशयात जलसमाधी मिळाली. रविवारी सायंकाळी 4.30 वाजताच्या सुमारास ही मनहेलावून सोडणारी घटना घडली. मंगेश मधुकर जुनघरे वय 35 वर्ष आणि त्याचा लहान भाऊ विनोद उर्फ लल्ला जुनघरे वय 31 वर्ष, रा. मोहपा रोड, उमरेड, जि. नागपूर अशी मृतक भावंडाची नावे आहेत. गोसेखुर्द जलाशयातील पॉवर हाऊस लगतच्या किनाऱ्यावरील ही घटना आहे. रविवारी मंगेश धाकट्या भावासोबत दुपारी 1 वाजताच्या सुमारास पवनी (जि. भंडारा) लगतच्या गोसेखुर्द धरण बघावयास दुचाकीने निघाले. याठिकाणी बंदोबस्त असल्याने आणि धरणाकडे जाण्याचा मार्गच बंद करण्यात आल्यामुळे ते परतीच्या मार्गावर होते. अशातच त्यांना पॉवर हाऊसकडे गर्दी दिसून येत असल्याने जाण्याचा मोह झाला. जलाशयातील पॉवर हाऊस लगतच्या किनाऱ्यावर धाकटा भाऊ विनोद याने मोबाईल काढत सेल्फी काढण्यासाठी गेला. दोघेही हा सेल्फीचा आनंददायी क्षण टिपत असतानाच विनोदचा पाय घसरला. क्षणार्धात मंगेशने विनोदचा हात पकडला खरा परंतु दोघांचाही तोल गेला. अन्य एकाने दोघांनाही वाचविण्यासाठी हात पुढे केला परंतु त्याआधीच दोघेही जलाशयात वाहून गेले. मंगेश स्वस्त धान्य दुकान चालवायचा. त्याला चार वर्षाचा मुलगा आहे. विनोदने इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले होते. त्याला पुणे येथे नौकरी सुद्धा होती. लॉकडाऊनमुळे विनोद ‘वर्क फॉर्म होम’ याकारणाने घरीच वास्तव्याला होता. दोन वर्षापूर्वी विनोदचे लग्न झाले असून त्याला 8 महिन्याची चिमुकली आहे. दोन्ही भावंडे सुस्वभावी आणि लाडके होते. दोघांच्याही निधनामुळे कुटुंबाला आघात झाला असून या संपूर्ण घटनाक्रमामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मंगेशचा मृतदेह सापडला गोसेखुर्द जलाशयात घडलेल्या या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाला. घटना घडल्यानंतर तातडीने पोलीस, गोसेखुर्द जलायशाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. दोघांचाही सायंकाळी उशीरापर्यंत शोध घेण्यात आला. मृतदेह सापडले नाही. अखेरिस सोमवारी पुन्हा सकाळपासूनच शोधमोहिम सुरू झाली. सकाळी 9 वाजताच्या सुमारास मंगेश जुनघरे याचा मृतदेह मिळाला. विनोदचा शोध सुरू आहे.