*ते ” सहा पत्रकार अन व्हायरल झालेली आॕडीओ क्लिप*

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
छायाचीत्र – इंटरनेटवरून साभार
एका नेत्याने सहा पत्रकारांची सेंटिग करायची आहे.याप्रकारचे वाक्य बोलले अन गोंडपिपरी तालुक्यात रान पेटले.ते सहा पत्रकार कोण ? याचा शोध अनेक जेम्स बाँन्ड घेत आहेत.या 007 ना अद्यापही सूगावा गवसला नाही.मात्र एका आॕडीओ क्लिपने उडविलेल्या शिंतोड्यात गोंडपिपरीची पत्रकारीता मात्र काळवंटली.
पत्रकारीता बेभरोश्याची झालेली आहे.त्यामुळे अनेक पगारी पत्रकारांनी जोडधंदा सूरू केला.दुसरीकडे तालुका आणि ग्रामीण भागातील पत्रकारांचे मानधनाचा नावावर हात रिकामेच असतात.तरी बिचारे बातमीचा मागे सूसाट धावत सूटलेले असतात.मानधनाच नावाने पुरता ठणाठणात असलेल्या या क्षेत्राचे आकर्षक मात्र कायम आहे.अनेकजण या क्षेत्रात उडी घ्यायला तयारच आहेत.न्युज पोर्टलमुळे रोज एका नव्या पत्रकाराची ऐन्ट्री होतांना दिसत आहे.नवे तरूण पत्रकारीतेचा माध्यमातून समाजसेवा करू बघत आहेत,ही तशी सूखावणारी बाब.मात्र याचे दुष्परिणामही तेवढे,याचा प्रत्यय अनेकांना आलेला आहे.असो तर गोंडपिपरी तालुक्यातील एका नेत्याला खंडनीचा आरोपाखाली अटक झाली.या नेत्याने सहा पत्रकारांना मॕनेज करायचे आहे,असे बोललेली आॕडीओ क्लिपची सध्या तालुक्यात चर्चा सूरू आहे.यात त्याने कुणाचे नावे घेतली नसल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे ते सहा पत्रकार कोण ? याचा शोध तालुक्यातील सूज्ञ व्यक्ती आपआपल्या परिने घेत आहेत.त्या सहा पत्रकारांचा उलगडा केव्हा ना केव्हा होणारच मात्र या प्रकरणाने गोंडपिपरी तालुक्यातील पत्रकारीतेवरच शिंतोळे उडविलेत.पत्रकारांकडे संशयी नजरेने बघीतले जात आहे. ही संशयी नजर पत्रकारीतेशी काही टक्के प्रामाणिक असलेल्यांना अन या खंडणी प्रकाराशी तिळमात्र सबंध नसलेल्यांना बोचणारी आहे. एखादा नेता पत्रकारांकडे बोट दाखवून पैसे वसूल करतो,हा फारच वेदनादायक प्रकार आहे.राजकीय ,सामाजिक आणि अधिकार्यांशी पत्रकारांचे सबंध असतात.यातील कुणी पत्रकारांचा नावाचा वापर केला तर याला दोषी कोण ? राजकीय व्यक्तींशी फार जवळकी धोक्याची ठरू शकते.हे या प्रकरणातून समोर आले आहे.देव करो अन त्या सहा विरांचा शोध लवकर लागो. गोंडपिपरी पत्रकारीतेवर होणारी चिखलफेक थांबो…अशी आशा व्यक्त करू या…!