आई कनकाई सामाजिक संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सव निमित्त सुशिल कदम याच सामाजिक उपक्रम

सचिन पवार

रायगड ब्युरो चीफ

मो: 8080092301

माणगांव :-स्वातंत्र दिनाच्या अम्रुत महोत्सवी वर्षाच्या पूर्व संध्येला आई कनकाई सामाजिक संस्थेच्या दुसऱ्या वर्धापनदिनी होडगांव कोंड ता. माणगाव येथे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. 

सकाळी सत्यनारायणाची पूजा आटोपल्यावर दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थांचा गुणगौरव सभारंभ पार पडला. पंचक्रोशीतील जवळपास 150 विद्यार्थांना त्याचा लाभ झाला. संस्थेमार्फत प्रशस्तीपत्रक आणि कागदपत्र ठेवण्यासाठी फोल्डर देण्यात आले. हया विशेष प्रसंगी रस्त्यावरील हायमास्ट (उंच विद्युत खांब) चे लोकार्पण करण्यात आले. ह्यामुळे रायगड रस्त्यावर ये-जा करणाऱ्यासाठी भविष्यात विशेष मदत होणार आहे. 

दुपारच्या सत्रात स्वतंत्रदिनच्या 75 वर्षपूर्ती निमित् 75 वयवर्ष पूर्ण असलेल्या 75 जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. प्रत्येक व्यक्तीला प्रमाणपत्र, मानचिन्ह आणि चादर भेटवस्तू देण्यात आली. 

महिलांना हळदीकुंकू देवून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तर पुरुष मंडळींना टाल्कम पावडर भेट स्वरूपात देण्यात आली.

छोट्या मुलांना Zincovit औषधाचं वाटप करण्यात आले.

पंचक्रोशीतील होडगांव, खर्डी, जावळी, मुगवली, हातकीली, कविळवाळ, आडघर, उणेगांव, ताम्हाणे, जोर, गांगवली येथील शेकडो नागरिक हया दिवसभर पार पडत असलेल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थीत होते. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाकडून संस्थेसाठी शुभेच्छा स्वीकारण्याचे काम श्री सुशील कदम हे जातीने करीत होते. सुशील कदम यांना लहानपनापासूनच आवड कोणाला अडचण आली की त्यांना जाऊन मदत करणे. कोणतेही सामाजिक क्षेत्र असो ते निसंकोच पणे हातालात आहेत. अशा थोर व्यक्ती बद्दल माणगांव तालुक्यातच नाही तर रायगड जिल्ह्यात वा वा होत आहे.

संस्थेचे सर्व पदाधिकारी श्री राजू म्हस्के, श्री जयदास म्हस्के, श्री गणेश दबडे, श्री विश्राम शिगवण, श्री सुरेश शिगवण, श्री महेंद्र मोरे, श्री बाबल ढमाले, श्री गणेश कदम जातीने उपस्थित होते.संस्थेचे आधारस्तंभ असलेले उपसरपंच श्री शंकर खाडे, श्री मोहन खाडे, श्री अरुण हर्णे, श्री शिवाजी म्हस्के, श्री सचिन सतवे, श्री राजू पालकर, श्री मारुती बागवे यांचे सहकार्य फार मोलाचे होते.श्री भालचंद्र खाडे, श्री शंकर शिंदे, श्री अजित शेडगे आणि श्री सचिन कदम सर यांचे विशेष सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here