जोगेश्वरीत दहीहंडी साहसी सराव शिबीर संपन्न

पूनम पाटगावे

जोगेश्वरी मुंबई प्रतिनिधी

मो: ८१४९७३४३८५

जोगेश्वरी :- येथील न्यू षटकार क्रीडा मंडळ, मेघवाडी यांच्यातर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आदर्श नगर, दुर्गामाता मंदिर, मेघवाडी येथे विभागातील गोविंदा पथकांसाठी दहीहंडी साहसी सराव शिबीर आयोजित करण्यात आले. जोगेश्वरीतील मेघवाडी, गांधीनगर, श्यामनगर, कोकणनगर, गांधीनगर, पंपहाऊस मधील अनेक महिला व पुरुष गोविंदा पथकांनी उपस्थित राहून उंच उंच थर रचून दहीहंडी फोडण्याचा मान पटकवला. सदर न्यू षटकार क्रीडा मंडळातर्फे उपस्थित गोविंदा पथकांना पदक, चषक मेडिकल प्रथमोपचार बॉक्स आणि तुळशी रोप देऊन सन्मानित करण्यात आले.

या शुभप्रसंगी प्रमुख पाहुणे मा. श्री. अनंत नर यांनी छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात केली. सदर कार्यक्रमप्रसंगी शिवसैनिक पदाधिकारी आणि गोविंदा पथके मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here