१५ ऑगस्त, ७५ वा स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव वर्ष पंचायत समिती रोहा कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा

64

१५ ऑगस्त, ७५ वा स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव वर्ष पंचायत समिती रोहा कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा

शहानवाज मुकादम 

रोहा शहर प्रतिनिधी

मो. 7972420502

रोहा:तालुक्यातील पंचायत समिती रोहा कार्यालयात 75वा स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव वर्ष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,

भारत देशातील सर्वच क्षेत्रात अलौकिक स्वरुपाचे यश प्राप्त केले आहे, भारत देशाची राज्यघटना देशातील प्रत्येक घटकास सन्मान हक्क अधिकार बहाल करते.

स्वातंत्र्य प्राप्ती नंतर कला क्रिडा विज्ञान त्या सोबत सामाजिक शैक्षणिक या सर्व क्षेत्रांमध्ये देशाची वाटचाल अभिमानास्पद आहे.

या वर्षी संपन्न झालेल्या विविध जागतिक स्पर्धामध्ये ग्रामीण भागातील तरुणांनी नवा अदर्श प्रस्थापित केला आहे.

या स्वातंत्र्य दिवशी अपण समाज कार्यात हिरिरीने सहभाग घेणाऱ्या व्यक्तींचा आणि विद्यार्थ्यांचा सन्मान केला आहे.पंचायत समिती कार्यालय रोहा च्या प्रांगणात मा,गट विकास अधिकारी सौ,श्रीम शुभदा पाटील मेडम यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला, तसेच पंचायत समिती च्या सभागृहा मध्ये अयोजीत कार्यक्रम विविध प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

सदर च्या कार्यक्रम प्रसंगी मा.गट विकास अधिकारी श्रीम, शुभदा पाटील म्हणाले अज आपण देशाच्या स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव साजरा करतोय, हि बाब अपल्या साठी निश्चितच अभिमानास्पद आहे.