माणगावात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी एस.आर.टी.चे सराव पथक
सचिन पवार
रायगड ब्युरो चीफ
मो: ८०८००९२३०१
माणगांव :-माणगावमधील एसआरटी पथकाच्या रेस्क्यू टीम जवानांनी माणगाव नगरपंचायत हद्दीतील जुने माणगाव येथील हॉटेल मयूरा जवळील पाणवठा येथून काळनदीत भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनी म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एसआरटी पथकाच्या रेस्क्यू टीम जवानांनी एकत्रित येत मान्यवरांना निमंत्रित करून काढले ते सराव करून प्रत्यक्षता दाखवून रॅली काढली.हि प्रथमच माणगावात रॅली काढण्यात आली.यावेळी साळुंखे रेस्क्यू टीमचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी आपल्या साळुंखे रेस्क्यू टीमबद्दल उपस्थित मान्यवर याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व नागरिकांना रेस्क्यू ची थोडक्यात माहिती दिली.
या कार्यक्रमास माणगाव तालुक्याचे उपविभागीय अधिकारी उमेश बिरारी,तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील,पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील,माणगाव नगरीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार,उपनगराध्यक्ष सचिन बोंबले,नगरसेवक कपिल गायकवाड,नगरसेवक दिनेश रातवडकर,नगरसेवक प्रशांत साबळे,स्वीकृत नगरसेवक हेमंत चंद्रकांत शेट,माजी स्वीकृत नगरसेवक नितीन बामगुडे,आर.डी.साळवी, पोलीस कॉन्स्टेबल एस.बी.सुरवसे,एसआरटी पथक महाड,आदींसह जुने माणगाव येथील ग्रामस्थ मोठया प्रमाणात उपस्थित होते.