माणगाव चांदोरे हद्दीत नदीपात्रात सापडली पांढरा रंगाची कार

48

माणगाव चांदोरे हद्दीत नदीपात्रात सापडली पांढरा रंगाची कार

दिपक दपके 

माणगाव शहर प्रतिनिधी

मो 9271723603

मिळालेल्या माहितीनुसार माणगाव तालुक्यातील चांदोरे गावच्या हद्दीत आज दिनांक 16/08/2022 रोजी सकाळी 10.00 वा. सुजीत शिंदे रा. चांदोरे यांनी फोन करून कळविले की, चांदोरे गोवचे हद्दीत नदीमध्ये एक पांढऱ्या रंगाची फोर व्हिलर गाडी पडलेली आहे.

सदर घटनेची खात्री करणे करिता. उपविभागीय पोलीस अधिकारी . प्रवीण पाटील माणगाव विभाग, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील पोलीस निरीक्षक मोहिते पोलीस रामनाथ डोईफोडे असे घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता एक चार चाकी संशयित वाहन क्रमांक MH14DF4167 ही गाडी ओढ्यामध्ये अर्धवट बुडलेल्या अवस्थेत सापडली तरी ते वाहन साळुंखे रेस्क्यू टीमच्या व क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आले.

सदर परिसराचा आजूबाजूला शोध घेतला असता काहीएक उपयुक्त माहिती व वस्तू मिळून आलेली नाही. सदर गाडी माणगाव पोलीस ठाणे येथे आणून लावली असून, गाडीची अधिक चौकशी करत आहोत. पुढील तपास माणगाव पोलीस करत आहेत