वाडगाव येथे स्वातंत्रदिनाचे औचित्याने नुतन अंगणवाडीचे शुभारंभ

वाडगाव येथे स्वातंत्रदिनाचे औचित्याने नुतन अंगणवाडीचे शुभारंभ

जिल्हात स्मार्ट अंगणवाडी संकल्पना राबविणार – मंत्री आदितीताई तटकरे

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- अलिबाग तालुक्यातील वाडगाव येथे स्वातंत्रदिनाचे औचित्याने नुतन अंगणवाडी शुभारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
आदिवासी वाडगाव येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अलिबाग यांचे नियोजनातून नुतन अंगणवाडी बांधकाम करण्यात आले. या नुतन अंगणवाडीचा शुभारंभ शुक्रवार दि. 15 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्रदिनाचे औचित्याने महिला व बालविकास मंत्री अदितीताई वरदा सुनिल तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी त्याचे समवेत राजिप मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, राजिप जिल्हा कार्यक्रम अधिकारी निर्मला कुचिक, तसेच सोहिता ओव्हाळ, अलिबाग पं.स.गटविकास अध्ािकारी दाईगडे, सहा.गटविकास अधिकारी तथा बालविकास प्रकल्प अधिकारी शर्मिला पाटील, राजिप उप अभियंता राहूल शेवाळे, विस्तार अधिकारी विजय मयेकर, अमित नाईक,पर्यवेक्षीका भाग्यश्री पाटील, सामिया पेरेकर, कल्पिता साळावकर, गिताजंली, पाटील, विनोदिनी मोकल, व आरती मोकल आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन वाडगाव ग्रामपंचायत व उपसरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष जयेंद्र भगत यांनी केले होते.
कार्यक्रमाचे सुरूवातीला भव्य स्वागत वाडगाव ग्रामपंचायतीचे वतीने व राजिप शाळा शिक्षक यांचे वतीने महिला व बालविकास मंत्री अदितीताई वरदा सुनिल तटकरे यांचे करण्यात आले. प्रारंभी अंगणवाडी विदयार्थ्यासह मंत्री अदिती तटकरे यांचेसह दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम झाला, त्यानंतर महिला व बालविकास मंत्री अदितीताई यांचे हस्ते फित कापून नुतन अंगणवाडीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी वाडगाव ग्रा.प. माजी सरपंच सरिता भगत यांनी महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांचे तसेच सरपंच सारिका पवार यांचे हस्ते राजिप मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांचे स्वागत पुष्पगूच्छ प्रदान करून करण्यात आले. या कार्यक्रमाचे निमित्ताने मंत्री आदितीई तटकरे यांचे हस्ते 6 महिने पुर्ण मुलांच्या अन्नप्राशन, वाडगाव आदिवासी वाडीवरील गरोदर स्तनदा माताना बेबी केअर किट, तसेच लेक लाडकी च्या लाभार्थीना रूपये 5000/- रोख धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी वाडगाव ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासीवाडी रोड लाईट व विदयुतीकरण, तसेच हर घर जल नळ कनेक्श्न यांचा शुभारंभ मंत्री अदिती तटकरे यांचे हस्ते करण्यात आला.
यावेळी उपस्थितांना संबोधीताना जिल्हात स्मार्ट अंगणवाडया संकल्पना राबविणार असल्याचे सुतोवाच केले तर रायगड जिल्हा परिषदे मार्फत् अंगणवाडीतील विविध उणीवाची लागलीच पुर्तता करण्यात येते असे म्हटले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वाडगाव ग्रा.प. उपसरपंच जयेंद्र भगत, सरपंच सारिका पवार, माजी सरपंच सरिता भगत तसेच ग्रामपंचायत सदस्य, सदस्या शुभांगी भगत, रूपाली प्रसाद पाटील, सजना नाईक,सरिता भगत,संतोष बोले, निलम नरेश थळे, अ
व ग्रामपंचायत कर्मचारीवर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास आयएसओ लीड किरण भगत, राजिप शाळा वाडगाव शिक्षकवर्ग, अंगणवाडी सेविका व आदिवासी वाडी महिला वर्ग यांची उपस्थिती होते.