अखिल बुरूड समाज प्रतिष्ठानर व युवा-प्रतिष्ठान ठाणे.तर्फे मोफत आरोग्य शिबीर संपन्न
संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३
कर्जत :- स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दहिवली येथील साई मंदीर येथे अखिल बुरूड समाज प्रतिष्ठान युवा प्रतिष्ठान ठाणे व जीवक आयुर्वेद रुग्णालय कडाव यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले.
व दहिवली विचार मंचचे चे सहकार्य लाभले. पंचक्रोशीतील गरिब व गरजु नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी आणि जागरूकते साठी हे शिबीर भरविण्यात आले असून
तज्ञ वैद्यकीय डाॅ अशोक लोंढे, डाॅ.शुभम डोके, फार्मासिस्ट प्रिती पवार आणि त्यांचे सहकारी याचे तपासनीत आवश्यक मार्गदर्शन व सल्ला देण्यात आला.
तसेच गरजूंना मोफत औषध -गोळ्या देण्यात आल्या. सदर शिबीराद्वारे परिसरातील 123 रहिवाशांनी याचा लाभ घेतला.
या शिबिरास प्रसाद थोरवे (शिवसेना रायगड युवा अध्यक्ष) , अंकुश दाभणे (शिवसेना कर्जत तालुका सचिव) , जयवंत साळुंखे, संतोष निलधे (आर्मी ऑफिसर), सुनिल जाधव (दहिलवली विचार मंच),
सचिन चिखलकर (साईमंदीर ट्रस्ट) हे विशेष निमंत्रित प्रमुख पाहुणे उपस्थित होते. उत्कृष्ट सेवाभावी कार्यक्रम संपन्न झाला. प्रसंगी दहा पाहुण्यांना प्रतिष्ठान तर्फे शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान पत्र
आबासाहेब पवार (प्रतिष्ठान अध्यक्ष), प्रकाश माने (महासचिव) यांच्या हस्ते देण्यात आले व युवा-प्रतिष्ठान प्रतिष्ठानच्या महिला विभाग विभाग कार्याध्यक्ष-ज्योती ताई, प्र.माने व अनिता ताई आ.पवार यांचे हस्ते महिला वैद्यकीय अधिकारी-तृप्ती पवार,
अनघा अदीला याना सन्मानित करण्यात आले. सदानंद गायकवाड. व प्रदिप माने स्नेहल नागे यांनी फोनवर शुभेच्छा दिल्या, या प्रसंगी प्रतिष्ठान युवा प्रतिष्ठान अध्यक्ष अशोक पवार महासचिव राजेंद्र नागे व कार्यकर्त्यांनी विषेश मेहनत घेतली.