*आर्थिक विकास महामंडळाने बेरोजगारांना थेट कर्ज द्यावे व पुर्वीचे कर्ज माफ करावे समता सैनिक दलाची मागणी.*

मुख्यमंत्र्यांना पाठवले निवेदन

वर्धा:– सुशिक्षित बेरोजगारांना व्यावसायाकरिता आर्थिक विकास महामंडळाकडून थेट कर्ज देण्यात यावे तसेच त्यांनी पूर्वी घेतलेले कर्ज माफ करावे अश्या मागणीचे निवेदन समता सैनिक दलाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे पाठविण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्याकरिता महात्मा फुले, वसंतराव नाईक, मौलाना आझाद, संत रोहिदास व आदिवासी विकास मंहामंडळाची स्थापना करण्यात आली. यात बोटावर मोजण्याईतक्यांचा फायदा झाला. मात्र हजारो बेरोजगारांची राष्ट्रीयक्रुत बँकेच्या हेकड प्रवुत्तीच्या अधिका-यांमुळे निराशाच झाली. एकतर बेरोजगारीचा भस्मासुर, त्यात कोरोणाचा प्रादुर्भाव अश्या अवस्थेत दलीत, पिडीत, आदिवासी, भटके, ओबीसी समाजातील बेरोजगारांनी कसे जगावे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
आर्थिक महामंडळाने शिफारस केलेले कर्ज प्रकरणे बँकेत धूळ खात पडली आहेत. प्रतिकूल परिस्थितीत बेरोजगारांनी एक-एक कागद जमा करून कागदपत्रे सादर केली परंतु हातात निराशाच आली.त्यामुळे छोट्या उद्योगाचे स्वप्न धुळीस मिळाले आहेत. आपण या राज्याचे सक्षम नेतृत्व आहात.तेव्हा बेरोजगारांच्या भावना लक्षात घेऊन आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना थेट कर्ज देण्याचे आदेश पारित करावे तसेच बेरोजगारांवर पूर्वीचे असलेले कर्ज माफ करावे अशी मागणी समता सैनिक दलाच्या निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देताना समता सैनिक दलाचे जिल्हा संघटक मार्शल अभय कुंभारे,ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश निमसडकर, महासचिव स्वप्निल कांबळे,समता सैनिक दलाचे जिल्हा संरक्षक प्रमुख प्रदीप कांबळे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकार संघाचे सचिव प्रदीप भगत,मिलिंद मून,सुमित शेंदरे,विवेक खोब्रागडे, उमेश मून,गौतम देशभ्रतार, अमरदिप कांबळे, त्रिशरण लांबे,प्रफुल कांबळे, ऋषी फुसाटे, विलास चुनारकर,राजु साळवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here