चिखल तुडवीत महिला सभापती पोहचल्या शेत शिवरात

राम राठोड
दिग्रस तालुका प्रतिनिधी
तालुक्यात सतत पाऊस चालू असल्यामुळे नदी, नाल्याला पूर आले आहे. तर काही ठिकाणी नदी नाल्याचे पाणी काठाशेजारील शेतात शिरले आहे. व काही गावात घरात पाणी शिरून अन्नधान्यांची नासाडी झाल्याने त्याच पूरग्रस्तांच्या पाहणी करिता चिखल तुडवित महिला सभापती सौ. अनिता दिवाकर राठोड ह्या थेट शेत शिवारात पोहचून पाहणी केली आहे. व सोबत गटविकास अधिकारी रमेश खारोडे, माजी जि.प. सदस्य दिवाकर राठोड यांनी सुद्धा वसंतनगर,फेट्री, व कांदळी,येथील पुरग्रस्थाची पाहणी करून नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या,पुरामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन,कापूस,पिकांची पाहणी करून सभापती राठोड यांनी आमदार संजय राठोड याचे माध्यमातून मदतीकरिता शासन दरबारी बाब मांडू असे बोलून दाखविले,
यावेळी कृषी अधिकारी डाखोरे, दिवाकर राठोड,विभाग प्रमुख तानाजी घुमनर,चरणसिंग राठोड, सरपंच,उपसरपंच इम्रान अल्ली, व ग्रामसेवक काजळे उपस्थित होते.