डेंगू आजारावर आळा बसण्यासाठी फॉग मशीनद्वारे फवारणी करा
प्रहार जनशक्ती पक्षाकडून गटविकास अधिकाऱ्याला निवेदन

प्रहार जनशक्ती पक्षाकडून गटविकास अधिकाऱ्याला निवेदन
दिग्रस तालुका प्रतिनिधी :- राम राठोड
तालुक्यात सध्या डेंग्यू रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात ग्रामीण भागात डेंगू आजाराचा प्रसार फार मोठ्या प्रमाणात होत असल्याने या आजारावर प्रतिबंध लावण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये फॉग मशीनद्वारे फवारणी करण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती कडून गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
शहराबरोबरच ग्रामीण भागातही ८० टक्के आजार हा अस्वच्छतेमुळे होत असून सध्या पावसाचे दिवस आहेत. या पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे मच्छराची संख्या मोठया प्रमाणात आहे.
या अस्वच्छतेमुळे सध्या ग्रामीण व शहरी भागात डेंगू या आजाराचे रुग्ण फार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अशा परिस्थितीमध्ये गावांमध्ये रोगराई चे वातावरण निर्माण होऊन ग्रामीण भागामध्ये प्रसार होण्याची भीती निर्माण होत आहे.त्यामुळे या रोगावर आळा बसवण्यासाठी गाव स्वच्छ व सुंदर करणे गरजेचे आहे.तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये फॉगिंग मशीनद्वारे संपूर्ण गावात फवारणी केल्यास या रोगाला आळा बसू शकतो. तरी प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये फवारणी करण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती संघटनेचे तालुका अध्यक्ष उमेश राऊत धीरज आडे व इतर कार्यकर्ते यांनी निवेदनाद्वारे केली आहे.