गडचिरोली BRSP चा कामगार कार्यालयावर कामगार समस्यांसाठी आक्रमक पवित्रा.!

51

गडचिरोली BRSP चा कामगार कार्यालयावर कामगार समस्यांसाठी आक्रमक पवित्रा.!

गडचिरोली BRSP चा कामगार कार्यालयावर कामगार समस्यांसाठी आक्रमक पवित्रा.!*
गडचिरोली BRSP चा कामगार कार्यालयावर कामगार समस्यांसाठी आक्रमक पवित्रा.!

मारोती कांबळे
गडचिरोली जिल्ह्या प्रतिनिधी
ग्रामीण मो. नं.९४०५७२०५९३

गडचिरोली:- गडचिरोली कार्यालयाला BRSP चा घेराव जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या विविध समस्यांसाठी व कार्यालयातील होणाऱ्या गैरव्यावहारा विरोधात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी गडचिरोली च्या वतीने कामगार कार्यालयाला घेराव घालण्यात आला.

कार्यालयामार्फत जिल्ह्यातील 5761 कामगारांना सहाय्य केले असल्याचे वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आले परंतु ते सहाय्य केले हे कुठल्या आधारावर आहे व त्याचा फायदा कुणाला झाला हे शंकाजनक आहे. त्याची यादी website वर प्रकाशित करण्यात यावी.

कामगार हा समाजाचा कणा आहे, त्याच्या जीवावर समाजातील अन्य घटक अवलंबून असतात व अशांसाठी शासन जर काही योजना राबवित असेल तर त्या योजना कामगारांपर्यंत पोहचणे अनिवार्य आहे.

त्यामुळं BRSP च्या वतीने कामगार विभागाची WEBSITE मधील अडचणी दूर कराव्यात , एजंट द्वारा कामगारांचे होणारे आर्थिक व मानसिक शोषण थांबवावे , कागदपत्राच्या पूर्तता करून सुद्धा लहान लहान त्रुटी साठी form अडवू नये , 1-2 वर्षांपासून cases त्रुटी नसताना अधिकाऱ्याकडून अडविण्यात येऊ नये , विविध योजना वाल्याना त्वरीत रक्कम देण्यात यावी, covid Relief फंड नियमित देण्यात यावी प्रसूती रक्कम थकीत ठेवू नये अशा मागण्या BRSP च्या वतीने करण्यात आल्या. कामगार अधिकारी सतत गैरहजर असतात. नोंदणी अधिकाऱ्याची नियुक्ती नसल्याने अनेक अडचणी येत आहे असे निदर्शनात आले.

यावेळी कामगार कार्यालयातील उपस्थित कामगारांसोबत चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या व अधिकाऱ्याला जाब विचारण्यात आला. व वरील सर्व समस्यांवर काय तोडगा काढले ते लिखित स्वरूपात 26 सप्टेंबर पर्यंत देण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी सांगितले.

आंदोलनात BRSP अध्यक्ष राज बन्सोड, महासचिव पुरुषोत्तम रामटेके, शहराध्यक्ष मिलिंद बांबोळे, विधानसभा प्रमुख गड महेश टिपले, तालुकाध्यक्ष दीपक बोलीवार, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष प्रितेश अंबादे, युवा आघाडी तालुकाध्यक्ष मुन रायपुरे, जितेंद्र बांबोळे, विजय देवतळे, संघरक्षित बांबोळे, सतीश दुर्गमवार, हेमंत रामटेके आदी पदाधिकारी उपस्थित होते.