*मोटार सायकलसाठी एमएच 26-बी झेड ही नविन मालिका*

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961
नांदेड :- मोटार सायकलसाठी एमएच 26-बीझेड (MH26-BZ) ही नविन मालिका 21 सप्टेंबर 2021 पासून सुरु होत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड मोबाईल नंबर व ईमेलसह अर्ज 20 सप्टेंबर रोजी दुपारी 2.30 पर्यंत स्विकारण्यात येणार आहेत. त्यानंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.
ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास 21 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता कार्यालयात त्याची यादी प्रदर्शित करण्यात येईल व लिखित संदेशाद्वारे (Text message) संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल. संबंधितांनी याबाबतची नोंद घ्यावी, असे आवाहन नांदेडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.