ओबीसी आरक्षणावरून भाजपचे तहसील समोर आंदोलन* *आघाडी सरकारच्या विरोधात भाजप ची जोरदार घोषणाबाजी*

44

*ओबीसी आरक्षणावरून भाजपचे तहसील समोर आंदोलन*

*आघाडी सरकारच्या विरोधात भाजप ची जोरदार घोषणाबाजी*

ओबीसी आरक्षणावरून भाजपचे तहसील समोर आंदोलन* *आघाडी सरकारच्या विरोधात भाजप ची जोरदार घोषणाबाजी*
ओबीसी आरक्षणावरून भाजपचे तहसील समोर आंदोलन*
*आघाडी सरकारच्या विरोधात भाजप ची जोरदार घोषणाबाजी*

✒साहिल महाजन✒
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
93097 47836

मारेगाव :– ओबीसी च्या आरक्षणावरुन आघाडी सरकार विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज अनेक ठिकाणी निदर्शने आंदोलन करण्यात आले.त्याचाच एक भाग म्हणून मारेगाव तालुक्यातील भाजप च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येथील तहसील कार्यालया समोर आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत,निदर्शने आंदोलन करून तहसीलदार मारेगाव यांना निवेदन देण्यात आले.
यामध्ये आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबिसी आरक्षणाची बाजु मांडण्यासाठी वकील का केला नाही? काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या या आरोपावर मुख्यमंत्री ठाकरे व जेष्ठ नेते शरद पवार यांनी उत्तर द्यावे.असा प्रश्न दिलेल्या निवेदनातून भाजप ने उपस्थित केला आहे. तसेच गेले सहा महीने आघाडी सरकार ओबिसी समाजाच्या राजकिय आरक्षणाबाबत टोलवा-टोलवी करत आहे. ओबिसी समाजाचा इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करा.असे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने राज्य सरकारला सातत्याने सांगीतले आहे.परंतू आघाडी सरकारने गेल्या सहा महीन्यात काही हालचालीच केल्या नाही. तसेच इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारने निधीच दिला नाही.
या हलगर्जीचा परीणाम ओबिसी आरक्षणाशिवाय पाच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जाहिर करण्यात आल्या. सत्ताधारी पक्षातील वजनदार गटाला पुढील वर्षी होणाऱ्या महापालीका,नगर पालीका,जिल्हापरिषद निवडणुका ओबिसी समाजाला आरक्षण न देताच घ्यावयाच्या असल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबिसी आरक्षणाची बाजु प्रभावी पणे मांडली नाही.राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी ची बाजू मांडण्यासाठी वकिलच उभा केला  नाही.मुख्यमंत्री महोदयांनी काही हालचालींच केल्या नाही.असाही आरोप भाजप च्या वतीने दिलेल्या निवेदनातून करण्यात आले आहे.
आगामी काळात होणाऱ्या निवडणूकीच्या अनुषंगाने आघाडी सरकारने ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी यावर लवकरात लवकर उपाय योजना करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी मारेगाव च्या वतीने दिलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे.
यावेळी भाजप चे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, शंकर लालसरे,प्रशांत नांदे,आनंद पचारे, अनुप महाकुलकर,सौ.शोभाताई नक्षणे,शारदा पांडे,शालिनी दारुंडे,मंगेश देशपांडे, रवी टोंगे, आदी उपस्थित होते