पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961
अलिबाग,जि.रायगड :- राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-
शुक्रवार दि.17 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी 4.30 वा. सुतारवाडी ता.रोहा येथून शासकीय वाहनाने रोहाकडे प्रयाण. सायंकाळी 5.00 वा.रोहा येथे आगमन व सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट आयोजित ह्दयविकार व अस्थीविकार चिकित्सा शिबीर कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : भाटे सार्वजनिक वाचनालय, रोहा. सायंकाळी 6.00 वा. रोहा तालुका प्राथमिक शिक्षक परिवार तर्फे कोविड प्रतिबंधक उपाययोजना साहित्य वाटप कार्यक्रम. स्थळ : द.ग.तटकरे सभागृह, पंचायत समिती रोहा. सोईनुसार रोहा येथून शासकीय वाहनाने सुतारवाडीकडे प्रयाण, सुतारवाडी ता.रोहा येथे आगमन व राखीव.