सावळी खुर्द येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी गठित.

55

सावळी खुर्द येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी गठित.

●नरेश कुकडे अध्यक्षपदी विराजमान तर सोनू पाटील सचिवपदी.
●नागपुर जिल्हा राष्ट्रवादी पक्षाचा वाढता प्रसार.

सावळी खुर्द येथे राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षाची कार्यकारिणी गठित. ●नरेश कुकडे अध्यक्षपदी विराजमान तर सोनू पाटील सचिवपदी. ●नागपुर जिल्हा राष्ट्रवादी पक्षाचा वाढता प्रसार.
सावळी खुर्द येथे राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षाची कार्यकारिणी गठित.

✒ युवराज मेश्राम ✒
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
कळमेश्वर:- नागपुर जिल्हातील कळमेश्वर पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सावळी खुर्द येथे दि.15 सप्टेंबर दुपारी एक वाजताच्या दरम्यान पारणुजी बारई याच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अविनाश गोतमारे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची कार्यकारिणी गठित करण्यात आली. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अविनाश भाऊ गोतमारे प्रामुख्याने उपस्थित होते. तसे युवराज मेश्राम नागपूर जिल्हा सरचिटणीस, भुजंग मोजनकर तालुका अध्यक्ष, मायाताई गणोरकर महिला तालुकाध्यक्ष, सोनालीताई गोडाणे, मनीष शेंडे, तालुका सचिव मुरलीधर बारई उपस्थित होते.

सावळी खुर्द येथील झालेल्या गाव समिती कार्यकारिणी गठित नरेश कुकडे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर सोनू पाटील यांची सचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष विजय लोखंडे यांची निवड करण्यात आली. तसेच सदस्य म्हणून विनायक कोहळे, अरविंदा कुकडे, नितीन मेश्राम, सागर बागडे, अभिजीत कुकडे, रोशन शिरसागर, राजेंद्र देवराव सावरकर, मंगेश कोहळे, कैलास कुकडे, शांताराम बावणे, विजय बागडे, सौ. वंदनाताई बारावी, सुनिता बागडे, सुमनताई बागडे, यांची सदस्य पदावर नियुक्ती करण्यात आली व त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अविनाश गोतमारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस युवराज मेश्राम, तालुका अध्यक्ष भुजंग मोजनकर, तालुका अध्यक्ष महिला आघाडी मायाताई गणोरकर, तालुका सरचिटणीस सोनालीताई गुंडाने, मनीष शेंडे, मुरलीधर बारई, यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती गठीत करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भुजंग मोजनकर यांनी केले तर आभार प्रदर्शन मुरलीधर बारई यांनी मानले. कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व गावकरी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.