‘कौशलपूर्ण पाठ¬क्रम अनुवाद हिंदी’ माध्यमातून रोजगाराची सुवर्ण संधी
डॉ. संजय धोटे यांचे उद्गार
✒️ देवेंद्र भगत ✒️
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
मो.8275348920
अमरावती – (दि. 16.09.2023)
‘कौशलपूर्ण पाठयक्रम अनुवाद हिंदी’ च्या माध्यमातून रोजगाराची सुवर्ण संधी प्राप्त होते, असे उद्गार हिंदी दिवसानिमित्त ‘हिंदी पखवाड़ा’ च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख वक्ता डॉ. संजय धोटे यांनी काढले. स्वामी विवेकानंदाच्या प्रति आदर आणि संत तुकडोजी महाराजांचे क्षेत्रीय भाषेप्रति आपुलकीचे उदाहरण देवून समजावून सांगितले. हिंदी भाषेसह इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे, जेणेकरुन भाषांतराच्या क्षेत्रात रोजगार प्राप्त केले जावू शकते. याला आपण भाषांतराच्या अनेक क्षेत्र, जसे पर्यटन, शिक्षण, मीडिया, जाहिराती, सिनेमा, डबिंग इत्यादिमध्ये अर्थाजन करुन रोजगार कसा मिळविला जाऊ शकतो, हे त्यांनी उदाहरणद्वारे सांगितले. हिंदी आपली राजभाषा आहे, जी संपूर्ण भारताला एकसूत्रात बांधून ठेवण्याचे कार्य करते, याच कारणामुळे अष्टम अनुसूचित 22 भाषांचा समावेश राज्यस्तरावर केला आहे, पण केंद्र आणि राज्यात प्रशासनिक कार्यासाठी हिंदीलाच स्वीकारले गेले आहे, म्हणून केंद्र आणि राज्य सरकारच्या कार्यालयात अनुवादक आणि राजभाषा अधिकारी पद सहजतेने प्राप्त करता येतात, असे ते म्हणाले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील हिंदी विभागाच्यावतीने आयोजित हिंदी दिवस निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ.राजेश सिंह कुशवाहा यांनी हिंदी पखवाड़ा अंतर्गत घेण्यात येणा-या विविध स्पर्धांची विधिवत घोषणा केली. ‘सत्य’ की परछाई सिर्फ ‘मौन’ (काव्य संग्रह) डॉ. सुनिता बुंदेले लिखित ‘मौन’ (काव्यसंग्रह) पुस्तकाचे प्रकाशन प्रा. डॉ.मोना चिमोटे, डॉ.संजय धोटे, डॉ. राजेश सिंग कुशवाह यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
डॉ. मोना चिमोटे यांनी हिंदी दिवसाच्या शुभेच्छा देताना सांगितले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्याथ्र्यांमधील कौशल्ये अधोरेखित करून त्यांना आत्मविश्वासाने रोजगार मिळवून देण्यासाठी आणि आजच्या स्पर्धात्मक युगात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यास सक्षम करते. स्वत:ला अद्यावत ज्ञानाने भरले पाहिजे, ज्ञान व विज्ञानाच्या माध्यमातून नवीन संशोधक घडवले पाहिजे. विद्याथ्र्यांनी संशोधनाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक डॉ. राजेश सिंह कुशवाह यांनी अध्यक्षीय भाषणात हिंदीचे महत्त्व विषद करताना, हिंदी ही आपल्याच लोकांची भाषा आहे, पण ती आपल्या स्वप्नांची भाषा आहे, आपल्या मातृभाषेशिवाय ज्ञानाची भाषा आहे. इतर भाषांना खूप महत्त्व आहे. गुगल सेन्सेसच्या नोंदीनुसार, 1 अब्ज 30 कोटी लोकांना हिंदी येते, जी एक सोपी, साधी आणि पटकन समजणारी भाषा आहे. ऐसी वाणी बोलिए मन का आपा खोये। औरन को शीतल करें आपहूँ शीतल होय।। अशा संत कबिराच्या ओळी त्यांनी यावेळी सांगितल्या.प्रास्ताविक प्रा.डॉ.जयश्री बडगे, संचालन प्रा. मालती यादव, तर आभार प्रा. डॉ.सुनिता बुंदेले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता प्रा. डॉ.चंदन विश्वकर्मा, प्रा. डॉ. रेखा धुराटे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला मराठी व अनुवाद हिंदी विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागाचे कर्मचारी श्री. उमाशंकर ठाकूर यांनी अथक प्रयत्न केले.