Home latest News इमारत बांधकाम कामगारांना आरोग्य कॅम्पच्या माध्यमातून आरोग्य तपासणीची सुविधा – शिवसेनेच्या पुढाकाराने...
इमारत बांधकाम कामगारांना आरोग्य कॅम्पच्या माध्यमातून आरोग्य तपासणीची सुविधा – शिवसेनेच्या पुढाकाराने उपक्रम उत्साहात संपन्न
प्रतिनिधी – सिद्धेश पवार
पोलादपूर तालुक्यातील मोरगिरी, सडवली आणि चोळाई ग्रामपंचायतीमधील असंघटित इमारत बांधकाम कामगारांना महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी आणि त्यांची आरोग्य तपासणी व्हावी यासाठी महाड विधानसभा मतदारसंघात आरोग्य कॅम्पचे आयोजन करण्यात आले.
हा उपक्रम महायुती माध्यमातून विशेष म्हणजे शिवसेना पक्षाच्या वतीने, मंत्री नामदार भरत गोगावले व युवा सेना कोअर कमिटीचे सदस्य विकासशेठ गोगावले यांच्या विशेष सहकार्याने, तसेच सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
उक्त आरोग्य कॅम्पद्वारे जवळपास 100 ते 200 बांधकाम कामगार आणि त्यांचे कुटुंबीय यांनी लाभ घेतला. कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली व त्यांना योजनेत नोंदणीसाठी मार्गदर्शनही करण्यात आले.
या उपक्रमात तालुकाप्रमुख निलेश अहिरे, उपतालुकाप्रमुख सतीश शिंदे, विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे महिला आघाडी विभाग संघटिका गीता ज्ञानेश्वर दळवी, महाळुंगे सरपंच विकास नलावडे, युवा सेना समन्वयक विक्रम भिलारे कार्यालय प्रमुख सुनील तळेकर, प्रसाद पवार, आदी मान्यवर उपस्थित होते.
आरोग्य विभागामार्फत हिंद संस्थेच्या टीममधील लॅब टेक्निशियन श्री. सोपान निकम, श्री. अमर पवार आणि सौ. प्राजक्ता पवार यांनी कामगारांची तपासणी केली. शिवसेना संपर्क कार्यालयात पार पडलेला हा कॅम्प अत्यंत उत्साहात व सकारात्मक वातावरणात पार पडला.
शेवटी, कामगारांच्या आरोग्यविषयक गरजा ओळखून त्यासाठी शासनाच्या मदतीने आणि शिवसेनेच्या पुढाकाराने घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून, अशा प्रकारच्या कॅम्पमधून कामगारांना हक्काची सेवा व योजना मिळविण्यासाठी मोठा आधार मिळत आहे.