वाचनाची गोडी लावण्यासाठी ग्रंथपाल ज्योती म्हात्रे यांचा अनोखा उपक्रम

95

वाचनाची गोडी लावण्यासाठी ग्रंथपाल ज्योती म्हात्रे यांचा अनोखा उपक्रम

शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना दिली पुस्तकांची भेट

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय व तालुका वाचनालय, अलिबाग येथील ग्रंथपाल ज्योती प्रकाश म्हात्रे यांनी लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.
त्यांच्या पुढाकाराने नगरपरिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना उपयुक्त व वाचनीय पुस्तके देण्यात आली. प्रार्थनेच्या वेळेस किंवा रिकाम्या वेळेत विद्यार्थी ती पुस्तके वाचावीत, तसेच शिक्षकांनी त्या पुस्तकांवर आधारित प्रश्न विचारून मुलांचे ज्ञान वाढवावे, असे आवाहन सौ. म्हात्रे यांनी केले.
या उपक्रमाअंतर्गत नगरपरिषद शाळा क्र. २, ३ व ५ तसेच राजीप शाळा (तळ कावीर कावीर) येथील विद्यार्थ्यांना महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, झाशीची राणी, बिरबलाच्या गोष्टी, संत गाडगे महाराज आदी महान व्यक्तींवर आधारित पुस्तके भेट देण्यात आली.
सौ. म्हात्रे यांच्या या उपक्रमाचे पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी स्वागत केले असून, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.