OYO हॉटेलवर सेक्स रॅकेटचा भंडाफोड; तिघांना अटक, एक फरार
त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोर्टर मो 9096817953
नागपूर.नागपूर शहर पोलिसांच्या समाज सुरक्षा विभागाने (SSB) ऑपरेशन शक्ती अंतर्गत सोमवारी (१५ सप्टेंबर) संध्याकाळी मोठी कारवाई करत नागपूरातील हिंगणा रोडवरील OYO अर्बन रिट्रीट हॉटेलवर चालणारे सेक्स रॅकेट उध्वस्त केले.या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आली असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे सायंकाळी ४:५५ वाजता छापा टाकण्यात आला. ही कारवाई रात्री ११:१५ वाजेपर्यंत सुरू होती. यामध्ये पोलिसांनी एका तरुणीची सुटका केली असून तिला जबरदस्तीने देहविक्रीच्या व्यवसायात ढकलण्यात आले होते.
दरम्यान, आणखी एक आरोपी राजत राजेश डोंगरे फरार असून त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पोलिस तपासानुसार, आरोपींनी पीडित महिलेला ‘झटपट पैसे मिळतील’ असे आश्वासन देऊन देहविक्रीमध्ये ढकलले होते. या कारवाईत पोलिसांनी एकूण ६.३३ लाख रुपयांची रोकड आणि मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत.
या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १४३(२)(३) तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा, १९५६ चे कलम ३, ४, ५ व ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यांच्यासोबत एपीआय शिवाजी नानावरे, डब्ल्यूएचसी आरती चौहान, एनपीसी शेषराव राऊत, पीसी अश्विन मांगे, समीर शिखा, कुणाल मस्राम, नितीन, एचसी किशोर ठाकरे व डब्ल्यूपीसी पूनम शेंडे यांनी सहभाग घेतला.
पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणामागे कार्यरत संपूर्ण रॅकेटचा तपास सुरू असून फरार आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येईल.