महाबोधी बुद्धविहार मुक्तीसाठी राष्ट्रीय कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली व्यापक आंदोलनाची तयारी.

22

महाबोधी बुद्धविहार मुक्तीसाठी राष्ट्रीय कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली व्यापक आंदोलनाची तयारी.

भारतीय बौध्दमहासभा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यु जी बोराडे व विजय कांबळे यांची माणगाव तालुक्यात तातडीची बैठक

बोरघर / माणगाव
विश्वास गायकवाड
९८२२५८०२३२

मुंबई आझाद मैदान ते मंत्रालय येथे महाबोधी महाविहार मुक्तिसाठी १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून नियोजित आंदोलनाची पूर्वतयारी करण्यासाठी आज दि.१४ सप्टेंबर २०२५ रोजी माणगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबडेकर सभागृह कालवा रोड येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली.
हि बैठक रायगड जिल्हा दक्षिण विभाग अध्यक्ष संतोष जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी भारतीय बौध्दमहासभा संस्कार उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य विजय कांबळे व भारतीय बौध्दमहासभा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यु.जी.बोराडे यांनी आंदोलनच्या रणनितिचे सखोल विश्लेषण करत पुढील कार्ययोजना मांडली. या संपूर्ण आंदोलनाचे नेतृत्व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्दमहासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव साहेब आंबेडकर करणार आहेत अशी माहिती बोराडे यांनी दिली असून प्रत्येक तालुक्यातून आंदोलन करण्यासाठी उपस्थित राहण्यास आवाहन केले आहे. येथे सर्वांनी एकजूट आणि सामुहिक प्रयत्नांनी महाबोधी महाविहार मुक्तीसाठी ठोस आंदोलन करण्याचे ठरवले आहे. हि बैठक रायगड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये नवउत्साह निर्माण करणारी ठरली असून आगामी आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी ठोस पाऊल ठरणार असल्याचे सर्व उपस्थितांनी ठामपणे सांगितले.
या बैठकीस संपूर्ण रायगड जिल्हा दक्षिण विभाग परुष व महिला कार्यकारिणी उपस्थित होते तसेच माणगाव,तळा,म्हसळा,महाड, श्रीवर्धन,रोहा,पोलादापूर या तालुक्याचे पुरुष व महिला कार्यकारिणी उपस्थित होते.या बैठकीचे सूत्रसंचालन सरचिटणीस नवनित साळवी यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शनाची जबाबदारी महिला अध्यक्षा अस्मिता जाधव यांनी पार पाडली व अध्यक्षीय भाषण संतोष जाधव यांनी केले व सरणत्तय घेऊन बैठकीचा समारोप झाला.