शेलुबाजार येथे होलसेल किराणा दुकानात चोरी, चोरटे सीसीटीव्हीत कैद

50

शेलुबाजार येथे होलसेल किराणा दुकानात चोरी, चोरटे सीसीटीव्हीत कैद

आधी देखील भर दिवसा झाली होती शेलुबाजार येथे चोरी

विनायक सुर्वे प्रतिनिधी
वाशिम:- शेलूबाजार येथील औरंगाबाद नागपूर नॅशनल हायवे वरील होलसेल किराणा दुकानात मध्यरात्रीच्या वेळी, कुलूप तोडून शूटर उघडून लाखो रुपयाच्या चोरी झाल्याची घटना घडली. चोरी करताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून सीसीटीव्हीच्या आधारे मंगरूळपीर येथील पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

शेलू बाजार परिसरात चोरीचे प्रमाण वाढत आहेत ह्याच्या आधी देखील  शेलूबाजार येथील साईनगर येथे देखील दिवसाढवळ्या चोरीची घटना घडली होती त्याच्यामुळे शेलुबाजार येथील व्यापारी व स्थानिक नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार झालेला आहे.

शेलूबाजार येथील औरंगाबाद नागपूर हायवे वरील गोविंद किरण मध्यरात्रीच्या वेळेस चोरट्यांनी अंदाजे तीन ते चार लाख रुपयांचा महागडा माल व रोख रक्कम लंपास केले चोरी करणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत शेलूबाजार येथील मुख्य चौकापासून अवघ्या पन्नास फूट अंतरावर जुन्या पोलीस चौकी समोर असलेल्या दुकानात चोरी झाल्यामुळे शेलूबाजार येथील चोरीची दुसरी घटना असल्यामुळे येथील व्यापार्‍याच्या व स्थानिक नागरिकांच्या मनात अत्यंत भीतीचे वातावरण तयार झालेला आहे या चोरट्यांचा शोध घेऊन तात्काळ अटक करावी अशी मागणी जनतेतून होत आहे

या सर्व प्रकरणाचा पुढील तपास मंगरूळपीर येथील ठाणेदार धनंजय जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मोरे व भगत जमदार जमदार करत आहेत