हिंगणघाट नगर पालिका निवडणुक: प्रभाग क्र.9 मध्ये उमेदवार म्हणुन सुरेश गायकवाड यांच्या नावाची चर्चा.

47

आशिष अंबादे✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
हिंगणघाट:- हिंगणघाट नगर पालिकेच्या सार्वत्रीक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यात युवा तरुण अनेक नविन उमेदवाराने निवडणूक लढण्याकरिता कमर कसल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे. हिंगणघाट शहरातील प्रभाग क्रमांक 9 मधून युवा समाजसेवक आणि आपल्या परिसरातील प्रश्नाला वाचा फोडणारे सुरेशभाऊ गायकवाड यांचे नावाची उमेदवार म्हणुन संपुर्ण प्रभागात चर्चाचा विषय ठरत आहे.

हिंगणघाट शहरातील प्रभाग क्रमांक 9 मधील नागरिकांच्या सर्वे मधून वृद्ध, महिला आणि तरुणाच्या मतानुसार सुरेशभाऊ गायकवाड यांना या प्रभागाची ऊत्तम प्रकारे जाणीव आहे. ते या प्रभागाच्या सर्वागीन विकासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. असे मत प्रभागातील नागरीकानी मिडिया वार्ता न्युजच्या प्रतिनिधी जवळ व्यक्त केले आहे.

गरीब परीवारातून असलेले सुरेशभाऊ गायकवाड हे माघिल अनेक वर्षा पासून सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आले आहे. गरिबीतून वर आलेल्या सुरेशभाऊ ना गरीबांच्या समस्याची जाणीव आहे. त्यामूळेच देशात आलेल्या कोरोना वायरसच्या महामारीच्या काळात अनेक गरीब, कामगार, गरजूंना सळळ हाताने मदत केली.

हिंगणघाट शहरामधील काही इच्छुक युवा कार्यकर्ते आपल्या प्रभागात तन, मन आणि धनाने कार्य करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच पैकी सुरेशभाऊ गायकवाड हे आघाडीवर आहे. प्रभागामधील नागरिकांची आवाज बनुन सुरेशभाऊ गायकवाड यांनी आपल्या प्रभागात आपली उमेदवारी पक्की केली आहे. त्यामूळे अनेक धनधाकळ्या उमेदवाराना आता पासुन घाम फुटायला सुरुवात झाली आहे.