चारचाकीच्या भिषण अपघातात एक ठार
• अनियंत्रित कारची नाल्याच्या कठड्याला धडक, एक ठार तर एक जखमी
🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351
मुल : 16 ऑक्टोंबर
चामोर्शी मार्गे उमा नदी समोरील नाल्याच्या वळणावर चामोर्शी कडून मुल कडे जात असलेली भरधाव मारुती स्विफ्ट कंपनीची चारचाकी, वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने नाल्या चा कठड्याला जोरदार धडक देऊन अनियंत्रित चारचाकी पलटी झाली. या घटनेत चालकाचा घटनास्थळीच मृत्यु झाला व प्रवासात सोबत असलेली एक व्यक्ती गंभीर जखमी असून पुढील उपचारासाठी उपचारासाठी मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
हा अपघात रविवारी दुपारी 3.30 ते 4 वाजताच्या दरम्यान मुल पासुन 4 किमी. अंतरावर झाला. प्राथमिक माहितीच्या आधारे मृत चालक व चारचाकी वाहन तेलंगाणा मधील शिरपुर येथील असून घटनास्थळी मुल पोलीस पथक पोहचले. पुढील तपास ठाणेदार सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनात मुल पोलिस करीत आहेत.