भिवंडी महानगरपालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

अभिजीत आर. सकपाळ
ठाणे ब्युरो चीफ
9960096076
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका मा. प्रशासक तथा आयुक्त, श्री.अनमोल सागर (भा.प्र.से.) यांनी महानगरपालिकेच्या 4123 कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली आहे. मागील वर्षी तत्कालीन आयुक्तांनी रु.14,200/- इतके सानुग्रह अनुदान दिले होते. परंतु कर्मचारी संघटनांनी आयुक्तांना सानुग्रह अनुदानाकरिता बैठक बोलविण्याची विनंती निवेदनाद्वारे केली होती. कर्मचारी संघटनांची विनंती मान्य करुन आज दिनांक 15.10.2025 रोजी कर्मचारी संघटनेसोबत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये कर्मचारी संघटनांची विनंती विचारात घेऊन महानगरपालिकेची आर्थिक परिस्थीती बेताची असताना देखील कर्मचाऱ्यांच्या घरात दिवाळीचा सण आनंदाचा होण्यासाठी आयुक्तांनी रु. 14,500/- इतके सानुग्रह अनुदान मंजूर केले.
आयुक्तांच्या या निर्णयाने महानगरपालिकेचे कर्मचारी, कर्मचारी संघटनांमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्वांनी आयुक्तांचे आणि महानगरपालिका प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत.








